• Download App
    supriya sule

    “पवार संस्कारित” भावा – बहिणीचे “नैतिकतेच्या” मुद्द्यावर एकमत; अजितदादांनंतर‌ सुप्रिया सुळे म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा आवश्यक!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अखेर “पवार संस्कारित” भावा बहिणीचे नैतिकतेच्या मुद्द्यावर एकमत; अजितदादांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे म्हणाल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा आवश्यक!!, असे आज मस्साजोग मध्ये घडले.

    राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे मस्साजोग मध्ये पोहोचल्या. तिथे त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली. त्यादिवशी केज पोलीस ठाण्यात हजर असलेल्या प्रत्येक पोलिसाला फाशी द्या अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी केली. पोलिसांनी अद्याप मुख्य आरोपी संतोष आंधळेला अटक केली नाही. त्याचा सीडीआर आम्हाला पाहिजे. अन्य सात आरोपींचे देखील सीडीआर पाहिजेत. दोषींना फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. 25 फेब्रुवारी पर्यंत संतोष आंधळेला अटक झाली नाही, तर देशमुख कुटुंबीय अन्नत्याग आंदोलन करतील. असे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांच्या समवेत आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनवणे होते.

    वाल्मीक कराडला पोलिसांनी अटक केली नाही तर तो व्हिडिओ जारी करून मी पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायला जातोय असे म्हणाला त्याची असे करायची हिंमतच कशी होते??, असा असावा सुप्रिया सुळे यांनी केला.

    या सगळ्यात नैतिकतेच्या मुद्द्यावर मात्र “पवार संस्कारित” भावा-बहिणींमध्ये एकमत झाल्याचे दिसले. कारण सुप्रिया सुळे म्हणाल्या देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत नेते आहेत त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या. इथे खरा नैतिकतेचा मुद्दा आहे म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे. याआधी अजित पवारांनी देखील सिंचन घोटाळ्यातले स्वतःचे उदाहरण देऊन नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याचे सांगितले होते. यातून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढविला होता. आज सुप्रिया सुळे यांनी देखील तोच नैतिकतेचा मुद्दा काढून अजितदादांच्या वक्तव्याला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने तिसऱ्या “पवार संस्कारित” नेत्याचा राजीनामा मागितला. उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता याची आठवणही त्यांनी करून दिली.

    supriya sule on santosh deshmukh murder case supriya-sule has criticized walmik karad beed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ