विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात मराठा धनगर लिंगायत या आरक्षणाचे मुद्दे राजकीय दृष्ट्या पेटले असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे – फडणवीस सरकारला एक ऑफर दिली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा. आम्ही ताकदीने सहकार्य करू, अशी ही ऑफर आहे. Supriya Sule offer to cooperate strongly in the special session on reservation issue
पण त्यामुळे मूळात सुप्रिया सुळेंच्या पक्षाची ताकद आता उरली आहे किती?? आणि जेव्हा संपूर्ण ताकद होती, तेव्हा त्यांच्या सरकारने आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन का बोलावले नाही??, असे सवाल तयार झाले आहेत.
माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतरावांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर सुप्रिया सुळे बोलत होत्या.
महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आरक्षण हे विषय तापले असताना त्या सर्व समाजांच्या मागण्यासंदर्भात संवेदनशीलपणे चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे. आम्ही ताकदीनिशी सहकार्य करू, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले
महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडे 200 आमदार असूनही सरकार अस्थिरच आहे, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला.
पण सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे काही सवाल तयार झाले आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर विधिमंडळात ज्या ताकदीनिशी सहकार्य करू, अशी भाषा सुप्रिया सुळे करतात, ती मुळात सुप्रिया सुळे यांच्या पक्षाची ताकद उरली तरी आहे किती??, हा सवाल आहे. कारण अजितदादांच्या बाजूने आणि शरद पवारांच्या बाजूने नेमकी किती आमदार आहेत?? याविषयी उघडपणे कोणीच काही बोलत नाही. अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या 8 मंत्र्यांच्या निलंबनाचा विषय शरदनिष्ठ राष्ट्रवादीने सुरू केला होता, पण बाकी कुठल्याच आमदारांच्या निलंबनाचा विषय शरदनिष्ठ राष्ट्रवादीने काढला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीची नेमकी ताकद गुलदस्त्यातच किंवा झाकल्या मुठीतच ठेवणे शरदनिष्ठ राष्ट्रवादीने पसंत केले होते.
*अजित पवार मात्र 40 पेक्षा जास्त आमदार आपल्याकडे असल्याचा दावा करत खरी राष्ट्रवादी आपलीच असल्याचे स्पष्ट प्रतिपादन निवडणूक आयोगापासून विधिमंडळापर्यंत सर्वत्र करतात. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीच्या उरल्या सुरल्या ताकदीची अजित पवारांना आणि सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर गरज आहे का??, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. *
त्याचबरोबर राष्ट्रवादी जेव्हा अखंड होती आणि काँग्रेस बरोबर 15 वर्षे सत्तेवर होती, तसेच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अडीच वर्षे सत्तेवर होती, त्यावेळेला दोन्ही – तिन्ही पक्षांची ताकद पूर्ण बहुमताची होती. त्या ताकदीनिशी मराठा सह बाकीच्या सर्व आरक्षणाचा प्रश्न त्यांच्या सरकारांनी का मार्गी लावला नाही??, हा सर्वात कळीचा सवाल आहे. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यातून हे सवाल तयार झाले आहेत.
Supriya Sule offer to cooperate strongly in the special session on reservation issue
महत्वाच्या बातम्या
- इस्रायली ओलीसांच्या सुटकेवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- इस्त्रायल अन् हमासमध्ये 49 दिवसांच्या युद्धानंतर, 4 दिवसांचा युद्धविराम!
- Rajasthan Election 2023 : जोधपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी छापली लग्नपत्रिकेसारखी निमंत्रण पत्रिका!
- पुढच्या 23 दिवसांत 35 लाख शुभमंगल सावधान; 4.25 लाख कोटींची उलाढाल!!