• Download App
    Supriya Sule, Nana Patole क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील पैशाची चोरी करून महाविकास आघाडीचा निवडणुकीचा खर्च, सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी अमिताभ गुप्तांवर आणला दबाव

    Supriya Sule, Nana Patole : क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील पैशाची चोरी करून महाविकास आघाडीचा निवडणुकीचा खर्च, सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी अमिताभ गुप्तांवर आणला दबाव

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या दबावामुळे हा सगळा पैसा महाविकास आघाडीकडे वळविण्यात आला. त्यासाठी या दोन्ही नेत्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर दबाव आणला होता. बखर लाईव्हच्या हाती सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी अमिताभ गुप्तांशी बिटकॉइनचे पैसे द्या म्हणून केलेले संभाषण लागले आहे Supriya Sule, Nana Patol

    अमिताभ गुप्ता यांच्याशी झालेल्या संभाषणात सुप्रिया सुळे म्हणत आहेत, बॉस, तुम्ही सगळे बिटकॉइन कॅश का करत नाही? सध्या भाव चांगला आहे. निवडणुका तोंडावर आहेत. आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. कोणत्याही प्रकारचे चौकशीची काळजी करू नका. आपण एकदा का सत्तेत आलो की सर्व काही ठीक करू.


    G-20 summit : G-20 शिखर परिषदेत मोदी म्हणाले – ‘ग्लोबल साउथचा आवाज बुलंद करावा लागेल’


    नाना पटोले यांनी केलेल्या संभाषणात तर अमिताभ गुप्ता यांना थेट दमच दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमिताभ पैशाचे काय झाले, अशी मजा मस्ती करू नको.Supriya Sule, Nana Patol

    माझी आयपीएस अधिकारी आणि या प्रकरणात अटक झालेले रवींद्रनाथ पाटील यांनी हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. पुण्यातील कथित बहु-कोटी क्रिप्टो फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेल्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “२०१८ मध्ये माझ्या कंपनीने मला क्रिप्टोकरन्सी तज्ञ म्हणून एका प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, २०२२ मध्ये मला त्या प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मी १४ महिने तुरुंगात होतो. त्या काळात मी विचार करत होतो की नक्की काय घडले आणि मला का अडकवले गेले. माझ्या इतर सहकाऱ्यांसोबत आम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होतो.”Supriya Sule, Nana Patol

    पाटील यांनी पुढे सांगितले की, “आमच्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या गौरव मेहताने दोन दिवसांपूर्वी मला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शेवटी मी फोन घेतला तेव्हा त्याने २०१८ मधील अमित भारद्वाजच्या अटकेचा उल्लेख केला. त्यावेळी अमितच्या ताब्यात असलेले क्रिप्टोकरन्सी हार्डवेअर वॉलेट बदलण्यात आले होते. हे काम तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता आणि त्यांच्या पथकाने केले, असा मेहताचा दावा आहे.”Supriya Sule, Nana Patol

    रवींद्रनाथ पाटील यांनी पुढे सांगितले की, “आम्हाला अटक झाली, पण खरे गुन्हेगार अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री नवटक्के हे होते. गौरव मेहताने दावा केला की या बिटकॉइनच्या पैशांचा वापर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झाला.

     Supriya Sule, Nana Patole Accused of Pressuring Amitabh Gupta Crypto Fraud Funds Allegedly Stolen to Finance MVA Election Campaign; says Ravindra Patil

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..