• Download App
    Supriya sule keeping distance from "Baramati" and "Pawar politics" raise eyebrows पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून सुप्रिया सुळे "दूर"; वाढले "गूढ"!!

    पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून सुप्रिया सुळे “दूर”; वाढले “गूढ”!!

    Sharad Pawar

    नाशिक : अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामतीतल्या प्रत्येक घडामोडी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे या सुनिता पवार यांच्या शपथविधीनंतर मात्र पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून अचानक “दूर” झाल्याने त्यांच्याभोवतीचे राजकीय गूढ वाढले.Supriya sule keeping distance from “Baramati” and “Pawar politics” raise eyebrows

    – पुढे पुढे केल्याने सुप्रिया सुळे ट्रोल

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामतीतल्या प्रत्येक घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांनी भाग घेऊन अक्षरशः आपणच आता पवार कुटुंबाचे प्रमुख होत असे दाखवायचा “डाव” खेळला. त्यांनी सतत पुढे पुढे करून आपण कशा पवार कुटुंबातली आणि राष्ट्रवादीतली सूत्रे हलवत आहोत हे सुद्धा दाखवायचा प्रयत्न केला. सुनेत्रा पवारांच्या हाताला धरून त्यांनी अजित पवारांचे दर्शन सुऐ घडविले. पण त्या सगळ्या घडामोडींमुळे सुप्रिया सुळे पुढे करत असल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले, तरी त्या मागे हटल्याचे दिसले नाही.



    – सुप्रिया सुळे दिल्लीत

    पण अजित पवारांच्या एक्झिट नंतर तीनच दिवसांनी सुनेत्रा पवारांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी झाला आणि सुप्रिया सुळे बारामतीतून बाहेर पडून दिल्लीला निघून गेल्या. त्यानंतर त्या गेल्या चार-पाच दिवसांमध्ये बातम्यांमध्येच नव्हत्या. बारामती मध्ये आणि मुंबई किंवा पुण्यात घडलेल्या कुठल्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे नव्हत्या. अजित पवारांच्या विमान अपघातापासून ते दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण या विषयावर महाराष्ट्रात राजकीय रणकंदन सुरू असताना कुठेच सुप्रिया सुळे यांनी उघडपणे भाग घेतल्याचे दिसले नाही. त्याउलट गेल्या चार-पाच दिवसांमध्ये शरद पवारांनी दोन वेळा पत्रकार परिषदा घेतल्या. ते दोन वेळा गोविंद बागेतून उठून सहयोग सोसायटीत गेले. त्यांनी पार्थ पवार, रोहित पवार, जय पवार यांना मार्गदर्शन केले. रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार पवार साहेबांनी त्या सगळ्यांना अजित पवारांच्या स्मारक संदर्भात त्यांचे विचार सांगून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर भविष्यात कशा प्रकारची वाटचाल करायची याविषयी मार्गदर्शन केले. पण हे सगळे शरद पवारांनी केले.

    – रोहित पवार सुनेत्रा काकींमध्ये पाहतात अजितदादा

    आज सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान सुरू असताना सुनेत्रा पवार, पार्थ पवार, रोहित पवार श्रीनिवास पवार हे सगळे कुटुंब एकत्रितरित्या काटेवाडीच्या मतदान केंद्रावर पोहोचले होते‌‌. तिथे त्यांनी मतदान केले. त्या मतदानानंतरच रोहित पवारांनी आपण सुनेत्रा काकींमध्येच अजितदादा यांना पाहतो. अजित पवारांच्या एक्झिट नंतर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद यावे अजितदादांची सगळी खाती यावीत अशी सगळ्यांची इच्छा होती आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व्हाव्यात, अशी इच्छा आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्याचबरोबर 12 फेब्रुवारीला मुंबई पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल सगळ्या गोष्टी सांगणार असल्याचे सुद्धा रोहित पवारांनीच सांगितले.

    – पवारांचे मत पार्थच्या पारड्यात

    मात्र त्याच्या आधीच शरद पवारांनी पार्थ पवारच्या पारड्यात आपले मत टाकल्याची बातमी आली. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत्रे तरुण नेत्याकडे म्हणजेच पार्थ पवारकडे यावीत. पार्थला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे असा आग्रह शरद पवारांनी धरल्याच्या बातम्या समोर आल्या.

    – सुप्रिया सुळे “दूर” झाल्याने वाढले गूढ

    पण एवढ्या सगळ्या राजकीय घडामोडी बारामतीत घडल्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळे या कुठेही दिसल्या नाहीत. त्यांनी दिल्लीतल्या संसद अधिवेशनात भाग घेतला. त्यापलीकडे त्यांच्या कुठल्या बातम्या सुद्धा आल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरण बद्दल त्यांचे मत काय??, हे समोर आले नाही. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामतीत प्रत्येक घडामोडी पुढे पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे अशा अचानक पडद्यामागे का गेल्या??, पार्थ पवारला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे, अशी सूचना शरद पवारांनी का केली??, यामागे त्यांचा राजकीय हेतू काय?? एकीकडे स्वतःच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे यांचे महत्त्व वाढवायचे आणि दुसरीकडे पार्थसारख्या ज्युनिअर नेत्याच्या हातात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्रे सोपवायची आणि दोन्ही राष्ट्रवादी विलीन झाल्यानंतर सीनियर – ज्युनियर असा वाद निर्माण करून त्यामध्ये सीनियर म्हणून सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व एकीकृत राष्ट्रवादीवर प्रस्थापित करायचा “नवा डाव” शरद पवारांनी खेळलाय का??, असे सवाल समोर आले. पण हे सवाल शरद पवारांना कोणी विचारले नाहीत. सुप्रिया सुळे उत्तरे देण्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या सवालांची उत्तरे सध्या तरी मिळाले नाहीत.

    Supriya sule keeping distance from “Baramati” and “Pawar politics” raise eyebrows

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर; उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, अतुल सावेंनी केली घोषणा

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! e-KYC पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी