विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरद पवारांनी महाराष्ट्रात न जमलेली भाकरी दिल्लीत फिरवून खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड त्यांना विशिष्ट राज्यांचे प्रभारीपद सोपविले आहे. मात्र या विषयावर माध्यमांमध्ये फारशी चर्चा होताना दिसत नाही. Supriya Sule in charge of Punjab – Haryana NCP
त्यातही सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राबरोबरच पंजाब आणि हरियाणा या राज्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. याचा नेमका राजकीय अर्थ काय आहे?? यातले “बिटवीन द लाईन्स” वाचले की त्यातले पवारांना अपेक्षित असलेले गांभीर्य लक्षात येईल.
महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा यांच्यातला कॉमन फॅक्टर काढायचा झाला तर ही तीनही श्रीमंत शेतकऱ्यांची कृषी प्रधान राज्ये आहेत. शरद पवारांचे युपीए काळातील कृषिमंत्री पद या राज्यांमधील श्रीमंत शेतकऱ्यांना लाभदायक ठरले होते.
त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या विचार केला तर पंजाब मध्ये अकाली दलाचे नेते कै. प्रकाश सिंग बादल आणि बादल कुटुंबीय यांच्याशी शरद पवारांचे निकटचे संबंध होते आणि आहेत. हरियाणातील चौटाला परिवाराशी पवारांचे एवढे निकटचे संबंध नसले तरी हरियाणातल्या भाजप आणि जननायक लोकदल यांच्यातले संबंध लक्षात घेता पवार तिथे सुप्रिया सुळे यांच्यामार्फत काही वेगळीच खेळू शकतात.
भाजप आणि शिरोमणी अकाली दल या दोघांची राजकीय गरज या दोन्ही पक्षांचे सूत पुन्हा जुळविण्यात कारणीभूत ठरते आहे. 2020 मधली कृषी कायद्यांवरून या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली राजकीय कटूता पंजाब मधल्या राजकीय पराभवानंतर दूर होत आहे. तिथे आम आदमी पक्षापुढे काँग्रेस शिरोमणी अकाली तर हे दोन्ही पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले. अशावेळी अकाली दल भाजप या आपल्या जुन्याच मित्राच्या हातात हात घालायला तयार आहे. नेमके त्याच वेळी पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या हाती पंजाब राष्ट्रवादीचे प्रभारीपोषण प्रभारी पद सोपवून पंजाब मध्ये स्वतःची “एन्ट्री” केली आहे.
अर्थातच ही एन्ट्री पवार आणि बादल परिवाराच्या व्यक्तिगत संबंधांमधून भाजप आणि अकाली दल यांच्या संभाव्य राजकीय युती वर नेमका काय परिणाम करेल?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पण त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची पंजाब मधली एन्ट्री इतकी सहज साध्य देखील असणार नाही. कारण तिचे आम आदमी पक्षाच्या ताकदीपुढे बलाढ्य असणारे शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस दोन्ही पक्षपाला पाचोळ्या सारखे उडून गेले. तिथे राष्ट्रवादीचे अजून मुळातच रुजवण व्हायचे आहे. पण तिथे सुप्रिया सुळे भाजप आणि अकाली दल यांचे चुलत असताना जुळत असताना तिथे स्पॉयलरचे काम करू शकतात, असा राजकीय पंडितांचा कयास आहे.
Supriya Sule in charge of Punjab – Haryana NCP
महत्वाच्या बातम्या
- धुळ्यातील टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर बुलडोझर, AIMIM आमदाराने उभारले होते, हिंदू संघटनांच्या तक्रारीनंतर कारवाई
- नवीन ‘’डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल’’ लवकरच संसदेत सादर केले जाणार – राजीव चंद्रशेखर
- WATCH : ‘गोडसेही भारताचे सुपुत्र, औरंगजेब आणि बाबरसारखे आक्रमक नव्हते’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे वक्तव्य
- क्रिकेट चाहत्यांचा फायदा, जियोनंतर आता हॉटस्टार मोफत दाखवणार ICC क्रिकेट वर्ल्डकप, OTT स्पर्धेचा परिणाम