विशेष प्रतिनिधी
मुंबई : संतोष देशमुख प्रकरणांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचा मित्र वाल्मीक कराड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली, पण आत्तापर्यंत नामानिराळे राहिलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुराव्यांअभावी धनंजय मुंडेंवर कारवाई करण्याचे नाकारले. Supriya Sule demands action against Munde + Karad
सुप्रिया सुळे यांनी खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत आज पत्रकार परिषद घेऊन वाल्मीक कराड वर मनी लॉन्ड्रीग प्रकरणात आरोप केले. ईडीने त्याच्याविरुद्ध कारवाई का केली नाही??, असा सवाल केला. आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत वगैरेंवर पुरावे नसताना देखील कारवाई केली. पण पवनचक्कीच्या कंपनीने वाल्मीक कराड विरुद्ध पुरावे देऊन देखील ईडीने का कारवाई केली नाही??, असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला घेरले. संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात त्यावर सरकारला प्रश्न विचारणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या, पण त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात आत्तापर्यंत नामानिराळे राहिलेल्या अजित पवारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही.
अजित पवारांनी मात्र धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे कारण देत त्यांच्यावर कारवाई करण्याचे नाकारले. आत्तापर्यंत अजित पवार या सगळ्या प्रकरणात नामानिराळे राहत होते. ते आज प्रथमच पुण्यात पत्रकारांसमोर आले. कुठल्याही राजकीय नेत्याने दुसऱ्या कुठल्याही नेत्यावर आरोप करण्यापूर्वी पुरावे आहेत का नाही??, याचा विचार करावा. पुरावे असतील तर ते पुरावे चौकशी आणि तपास यंत्रणांना द्यावेत. केवळ संशय आहे म्हणून कोणाचा राजीनामा किंवा कारवाई मागू नये, असे अजित पवार यांनी सांगून धनंजय मुंडे यांचे समर्थन केले. चौकशी आणि तपासात कोणतीही मोठी व्यक्ती दोषी आढळली, तर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यांच्याशी मी सहमत आहे, अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली.
पण मूळात बीड मधली धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड नावाची प्रवृत्ती राष्ट्रवादीनेच जोपासली. तिचे भरण पोषण केले. या संदर्भात कुठल्याही पत्रकाराने सुप्रिया सुळे आणि अजित पवारांना वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये प्रश्न विचारले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही.
Supriya Sule demands action against Munde + Karad
महत्वाच्या बातम्या
- Tirupati तिरुपतीत चेंगराचेंगरी, 4 जणांचा मृत्यू; तिकिट बुकिंग काउंटरवर टोकनसाठी 4 हजार लोक होते रांगेत
- Congress : काँग्रेसला 1998 चा पचमढी ठराव अंमलबजावणीची “आयती” संधी; इंदिरा भवन मुख्यालयात जाऊन आखणार का रणनीती??
- Sheesh Mahal : ‘शीशमहाल तुमचे स्मशान बनेल’, दिल्लीच्या सीएम हाउसबाबत अनिल विज यांचं विधान!
- Delhi elections : राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी ममतांचा प्रादेशिक केजरीवालांना दिल्लीत पाठिंबा, काँग्रेस एकाकी!!