विशेष प्रतिनिधी
नाशिक : निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही. हा रडीचा डाव आहे. लाडकी बहिण योजनेशिवाय हे पास होत नाही तर यातच त्यांचे अपयश आहे. पैसे वाटप करून निवडणूक जिंकता येत नाही, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. Supriya Sule criticises Goverment on postponing elections
नाशिक दौऱ्यावर असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. नियम, कायद्याप्रमाणे 29 नोव्हेंबरच्या आत नावे सरकार आले पाहिजे. जम्मू- कश्मीर आणि हरियाणा मध्ये निवडणूक घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही असे ते म्हणाले. लोकसभेची निवडणूक घ्यायला फोर्स होती पण विधानसभेला फोर्स नाही हे हास्यास्पद आहे.
सुळे म्हणाल्या, सत्तेतील लोकं धमक्या देत आहेत. मतदान केलं नाही तर योजना बंद होईल असे सांगतात. आम्ही योजनेवर टीका केली नाही तर सूचना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्तृत्ववान व्यक्ती समजत होते. त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरत आहेत, हे दुर्दैवी आहे. मग तुमचं सॉफ्टवेअर काय करते आहे? फडणवीस यांनी चर्चेला यावं मी तयार आहे. बहीण इलेक्शन नंतर लाडकी झाली आहे.
नारपार गिरणा योजनेबाबत सुळे म्हणाल्या, पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. राज्य सरकारने उत्तर महराष्ट्रासाठी एक योजना काढण्याचा निर्णय घेतला होता. पण केंद्र सरकारने सांगितले की हे होऊ शकत नाही. दोन राज्यातील पाण्याच्या वाटपाचा तो विषय आहे. केंद्र सरकार म्हणत आहे की आम्ही तो प्रकल्प करणार नाही. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यामध्ये समन्वय नाही ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र हक्काचे पाणी मागत आहे. पाण्यावरून राजकारण होऊ नये . राज्य सरकारने नोकऱ्या जशा घालविला तसे , हक्काचे पाणी घालवू नये . निधीचा प्रश्न नाही, गंभीर विषय आहे. संवेदनशील विषय आहे, आरोप करायचे नाही
अजित पवार यांना भाजप कार्यकर्त्यांनीच काळे झेंडे दाखविले या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, हामहायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला वाईट वाटले. मानसन्मान ठेवला पाहिजे. किती निर्णय हे सरकार संविधान चौकटीच्या बाहेर जाऊन घेते हे पाहायला पाहिजे. आरक्षण रद्द करण्याची परिस्थिती येते असे आता तरी दिसत आहे.200 कोटी रुपयांच्या जाहिराती करतात. पण तेच पैसे आशा आणि अंगणवाडी महिलांना दिले असते तर त्यांची दिवाळी गोड झाली असती.
मुख्यमंत्री चेहरा कोण या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, दुसऱ्याच्या घरात झाकायला मला वेळ नाही. आम्ही तिन्ही पक्ष महागाई रोजगार आणि भ्रष्टाचार यावर चर्चा करू. पदापेक्षा राज्य ट्रॅकवर येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोप-प्रत्यारोप हे चॅनल वर असतात. संजय राऊत यांची स्टाईल आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण लक्षात ठेवा.
Supriya Sule criticises Goverment on postponing elections
महत्वाच्या बातम्या
- Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन
- Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??
- Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार