विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात संतोष देशमुख प्रकरण सुरू असताना भाजपचे आमदार सुरेश धस आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बैठक झाली त्यावरून महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस यांना मॅनेज होणार नसल्याचे सर्टिफिकेट दिले.
या सगळ्या राजकारणात चंद्रशेखर बावनकुळे वगळता बाकी सगळे नेते “पवार संस्कारित” राष्ट्रवादी प्रवृत्तीचेच असल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार असले तरी सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेली अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची प्रतिमा हानी करत आहे. संतोष देशमुख + धनंजय मुंडे+ वाल्मीक कराड प्रकरणात रोज वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. त्यातच 25 दिवसांपूर्वी झालेली बैठक वादग्रस्त ठरली. ती म्हणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावली होती. त्यामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात “पॉलिटिकल पॅचअप” करायचा प्रयत्न बावनकुळेंनी केला. या सगळ्या बातम्या तब्बल 25 दिवसांनंतर माध्यमांमध्ये आल्या दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर सुरेश धस त्यांना पुन्हा भेटून आले. मात्र, या सगळ्यांमुळे मनोज जरांगे चिडले आणि त्यांनी सुरेश धस यांच्यावर तोंडसुख घेतले. मराठ्यांच्या अन्नात माती कालवली, असा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करू, असे सुरेश धस म्हणाले.
पण या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस यांना “मॅनेज” होणार नाहीत, असे “सर्टिफिकेट” देऊन टाकले. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी वाचून धक्का बसला, पण सुरेश धस “मॅनेज” होणारे नाहीत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. हा सगळा “पवार संस्कारित” राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या राजकारणाचा खेळ ठरला. कारण सुरेश धस आज जरी भाजपचे आमदार असले, तरी ते मुळात “पवार संस्कारित” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार होते. धनंजय मुंडे यांचे ते जुने सहकारी होते, पण बीड जिल्ह्यातल्या राजकारणाचे आणि मराठवाड्यातल्या नेतृत्वाचे वेगवेगळे ताणेबाणे त्यांना दोन वेगळ्या ध्रुवांवर घेऊन गेले. आज त्या दोघांची भेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसली.
Supriya sule “certifies” Suresh dhas as no compromise leader
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…