विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya sule एकनाथ शिंदे सें बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही, असे म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी जातीय लाईन घेतल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. या बातम्यांची सोशल मीडियातली चर्चा अंगावर येताच सुप्रिया सुळे यांनी स्टान्स बदलला. फक्त फडणवीसांना टार्गेट करा, असं मी कुठे म्हटले??, तुमच्या कडे पुरावा किंवा व्हिडिओ आहे का??, तो दाखवा, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले. Supriya sule backtracked over her statement targeting devendra fadnavis only
देवेंद्र फडणवीस आणि भाजप सत्तेत आले नाही तर आपली डाळ शिजणार नाही. आपला जातीयवाद चालणार नाही. तसेच ही निवडणूक शरद पवार उद्धव ठाकरे यांची शेवटची ठरेल, असे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांच्या मूळ वक्तव्यांच्या बातम्यांवर दिले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी फक्त फडणवीसांना टार्गेट करा, असे आपण कुठे म्हटल्याचे पुरावे सादर करा, असे प्रतिआव्हान दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या :
पवार आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक हे भाजप बोलतायत, याचा अर्थ त्यांना परत निवडणूका घ्यायच्या नाहीय का?, भाजपला संविधान बदलायचे आहे हे स्पष्ट होते. भाजपच्या मनात संविधान बदलण्याचं पाप दिसून येतंय. भाजपचं हे विधान संविधानाच्या विरोधात आहे. आमचे सरकार ईडीच्या भितीने पाडले. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी ही योजना काढली आहे. खरंच योजना असती तर श्रेय वाद नसता. कोणाचे सरकार येईल ते जनता ठरवेल.Supriya sule
‘शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही’, अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले, अशा बातम्या समोर आल्या होत्या. या वृत्तांवर देखील सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. केवळ फडणवीसांना टार्गेट करा, असं मी कुठे म्हणाले?, मी कुठे बोलले याचं तुमच्याकडे पुरावा आहे का…तुमच्याकडे व्हिडीओ आहे का, मला तो दाखवा, असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिले.
लाडकी बहीण आठवली
वृत्तवाहिनीवर पाहिले की, देवेंद्र फडणवीस एसओपी (SOP) करणार आहेत. जाहिरात कशी करायची कोणी करायची ही एसओपी तयार करणार आहेत. एसओपी करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांना सबलीकरण करण्यासाठी नाही, तर स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता आहे. हे स्वार्थी सरकार आहे, लोकसभेला अपयश आल्यावर लाडकी बहिण आठवली. भाऊ-बहींण्याच्या नात्यांचा हा अपमान आहे, असा निशाणा सुप्रिया सुळेंनी साधला. Supriya sule
Supriya sule backtracked over her statement targeting devendra fadnavis only
महत्वाच्या बातम्या
- Solution Provider : पंतप्रधान मोदींच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात ‘सोल्युशन प्रोव्हायडर’च्या भूमिकेत
- Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील ‘AIIMS’मध्ये व्हेंटिलेटरवर हलवले
- Mohan Bhagwat : समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचल – मणिपूरमधल्या स्थितीत सुधारणा; सरसंघचालकांचा विश्वास!
- Vladimir Putin : ‘भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थ होऊ शकतात…’, युक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चेवर पुतिन यांची मोठी घोषणा