विशेष प्रतिनिधी
पुणे : दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यात उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!, असला प्रकारात बारामतीत घडला.Supriya Sule avoid long answer to the question on Sharad Pawar’s meeting with two persons
राहुल गांधींच्या मतांच्या चोरीच्या आरोपांना वेगळे वळण देण्यासाठी शरद पवारांनी दोन लोक आपल्याला भेटल्याची स्टोरी माध्यमांना सांगितली होती, पण त्या संदर्भात निवडणूक आयोग आपल्याकडे पुरावे आणि तक्रारीची मागणी करेल हे लक्षात येताच खुद्द पवारांनी नंतर तो विषय “गुंडाळून” टाकला. महाराष्ट्रातील त्यावरची चर्चा देखील त्यांनी “आपल्या पद्धतीने” थांबवली. परंतु, बारामतीत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी फक्त दोन वाक्यांमध्ये उत्तर देऊन त्यांनी देखील हात वर केले.
शरद पवारांना भेटलेली दोन माणसे कोण होती??, ती त्यांनी राहुल गांधींकडे का नेली??, त्यांनी कुणावर आरोप केला??, असे सवाल पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांनी साठ वर्षांच्या राजकीय आयुष्यात कोणावरही आरोप केले नाहीत. त्यांना दोन माणसं भेटली होती. टेक्नॉलॉजी संदर्भात काही सांगत होती. तेवढ्यात राहुल गांधींचा त्यांना फोन आला म्हणून ते त्यांना भेटले. पण यावर आपला विश्वास नाही. तो आपला मार्ग नाही, पुढे म्हणून पवार साहेबांनी तो विषय थांबविला. त्यांनी कुणावर आरोप केला नाही. ते फक्त स्टेटमेंट केलं, एवढेच बोलून सुप्रिया सुळेंनी त्या विषयासंदर्भात हात वर केला.
बाकीच्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे राहुल गांधींच्या आरोपांचे समर्थन केले. निवडणूक आयोगाचा डेटा राहुल गांधींनी जनतेसमोर मांडला. तो सगळ्या चॅनल वाल्यांनी दाखविला. तो निवडणूक आयोगाचा डेटा आहे. त्यामध्ये दुबार नावे आहेत हे सिद्ध झाले आहे. इथं प्रश्न इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा सुद्धा नाही. मतदार यादीच आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
Supriya Sule avoid long answer to the question on Sharad Pawar’s meeting with two persons
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगावर नुसते Hit and Run करून राहुल गांधींना मोदींची सत्ता घालवता येईल का??
- महादेवपुराचे उदाहरण देणाऱ्या राहुल गांधींना बारामतीचे उदाहरण देऊन अजितदादांचे प्रत्युत्तर!!
- Israeli Attack : इस्रायली हल्ल्यात अल जझीराचे 5 पत्रकार ठार; इस्रायलने त्यांना हमास दहशतवादी म्हटले
- Parinay Phuke : बेताल विधाने करून मनाेज जरांगेंचा मीडियामध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न, परिणय फुके यांची टीका