• Download App
    सलमानच्या घरावर गोळीबार झाल्याने सुप्रिया सुळे संतप्त; पण "बाहेरून आलेल्या पवार" टिप्पणीवर मूग गिळून गप्प!!|Supriya Sule angry over firing at Salman's house; But the "Pawar who came from outside" comment was swallowed and kept silent!!

    सलमानच्या घरावर गोळीबार झाल्याने सुप्रिया सुळे संतप्त; पण “बाहेरून आलेल्या पवार” टिप्पणीवर मूग गिळून गप्प!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याने खासदार सुप्रिया सुळे संतप्त झाल्या, पण शरद पवारांनी सुनेत्रा पवारांवर केलेल्या “बाहेरून आलेल्या पवार” या टिप्पणीवर मात्र मूग गिळून गप्प बसल्या!!Supriya Sule angry over firing at Salman’s house; But the “Pawar who came from outside” comment was swallowed and kept silent!!

    मुंबईत सलमान खान राहत असलेल्या इमारतीच्या दिशेने आज पहाटे गोळीबार करून दोन अज्ञात तरुण निघून गेले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षे संदर्भात चिंता निर्माण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या गंभीर प्रकाराची दखल घेऊन स्वतः फोन करून सलमान खानशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणाच्या तातडीच्या चौकशीचे आदेश दिले.



    या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे मात्र सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे संतप्त झाल्या. “अब की बार गोळीबार सरकार” अशा शब्दांमध्ये त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मॉर्निंग वॉकला निघालेल्या कोणावरही गोळीबार होतो आहे, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली.

    पण गेल्या तीन दिवसांपासून बारामतीत सुरू असलेल्या “मूळच्या पवार” विरुद्ध “बाहेरून आलेल्या पवार” या वादावर मात्र भाष्य करण्याचे सुप्रिया सुळे यांनी टाळले. कारण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या “बाहेरून आलेल्या पवार” आहेत, असे खुद्द शरद पवारांनी त्यांना हिणवले होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे, प्रशांत जगताप आणि इतर नेते हसले होते.

    पवारांच्या या भेदभावी आणि असभ्य टिप्पणी विषयी बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रभर पवारांच्या संताप उसळला. लेकीला एक न्याय आणि सुनेला दुसरा न्याय हेच पवारांना अपेक्षित आहे का??, महाराष्ट्राला महिला धोरण देणारे हेच का ते शरद पवार??, असा संतप्त सवाल अनेकांनी सोशल मीडियावर विचारून शरद पवारांना ट्रोल केले.

    पण एरवी शरद पवार आणि प्रतिभा पवार या आई-वडिलांच्या संस्काराची दुहाई देणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी मात्र आपल्या वडिलांच्या असभ्य आणि भेदभावी टिप्पणीवर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र सलमान खानच्या घरावर बाहेरून गोळीबार झाल्याच्या मुद्द्यावर संताप व्यक्त करायला सुप्रिया सुळे समोर आल्या.

    Supriya Sule angry over firing at Salman’s house; But the “Pawar who came from outside” comment was swallowed and kept silent!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक