• Download App
    सुप्रिया सुळे - अजित पवार समीकरण बसणे अवघड; महाराष्ट्रातला फेरबदलाचा पेपर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जातोय जड!!|Supriya Sule - Ajit Pawar equation difficult to fit The reshuffle paper in Maharashtra is going hard for the NCP leadership

    सुप्रिया सुळे – अजित पवार समीकरण बसणे अवघड; महाराष्ट्रातला फेरबदलाचा पेपर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जातोय जड!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्ष नेमल्यानंतर अजित पवारांनी महाराष्ट्रात संघटनात्मक पातळीवर काम करण्याची संधी मागितली, पण खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी पद सोपवल्याने सुप्रिया सुळे – अजित पवार समीकरण बसणे कठीण असल्याने राष्ट्रवादीचे नेतृत्व सध्या सावध पावले टाकत बॅकफूटवर आले आहे. त्यामुळे अजितदादांनी संघटनेतले पद मागितले असले, तरी त्यांना ते लगेच मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्याचे राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटात बोलले जात आहे.Drawing political equation between supriya sule and ajit pawar very difficult for NCP leadership

    राष्ट्रवादी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातले राजकीय समीकरण वाटते तेवढे सोपे नाही. एकतर पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित. त्यात महत्त्वाकांक्षी नेत्यांची संख्या अधिक. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला या महत्त्वाकांक्षांची वीण सोडवणेच फार अवघड जात आहे.



    तिकीट वाटपात सुप्रिया – अजितदादा संघर्ष

    अजितदादांनी गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीत काम करून आपले स्वतःचे समर्थक तयार केले आहेत. ते राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यात तालुक्यांमध्ये पसरले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडे जेव्हा पक्षाचे प्रभारी पद आले, तेव्हा या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निष्ठेचाच दुभंग तयार झाला आहे. अजितदादांनी हे वेळीच ओळखूनच विरोधी पक्षनेते पद नको, त्या ऐवजी संघटनेतले पद द्या अशी मागणी अत्यंत चलाखीने शरद पवारांकडे केली आहे. कारण सुप्रिया सुळे यांच्या हातात उद्याच्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीचे तिकीट वाटप गेले, तर आपल्या समर्थकांचे सटासट पत्ते कापले जातील, याची अजितदादांना भीती आहे आणि तोच नेमका त्यांच्या राजकीय भवितव्याला धोका आहे.

    हे जे अजितदादांना नेमकेपणाने समजते तेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला समजत नसेल, असे अजिबात नाही किंबहुना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला ते अधिक चांगले समजते. त्यामुळेच पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्याखेरीज महाराष्ट्रातले कोणतेही फेरबदल करता येणार नाहीत, असे कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी नव्हे, तर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. यातूनच अजितदादांची मागणी पूर्ण करण्याची बाब थोडी लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.

    बस्तान बसवायला सुप्रिया सुळेंना मदत

    पण हे करताना सुप्रिया सुळे यांना जी महाराष्ट्रात राजकीय बस्तान बसवण्याची मुदत मिळणार आहे, त्या दरम्यानच्या काळात त्या कितपत यशस्वी होतात?, याची लिटमस टेस्टही होणार आहे. कारण शरद पवारांनी आपल्या कन्येवर भरवसा टाकून त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपविले असले तरी महाराष्ट्रातले प्रभारी पद हा एक प्रकारे पक्षांतर्गत काटेरी मुकूट आहे आणि तो पेलणे हे खऱ्या अर्थाने सुप्रिया सुळेंपुढे आव्हान आहे.

     2019 सारखे अजितदादा बेसावध नसतील

    भले आत्ताच्या राजकीय समीकरणात अजितदादांना त्यांना अपेक्षित असलेले पद देणे लांबणीवर टाकता येईलही, पण त्याची मुदत फार मोठी वाढवून ठेवणे हे देखील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला कठीण आहे. कारण अजितदादांनी जर स्वतःचे ऑप्शन खुले ठेवले, तर ते 2019 च्या शपथविधी सारखे बेसावध असणार नाहीत, तर अधिक सावधानतेचे असतील याची पक्की जाणीव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला ठेवावी लागेल.

    मग सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे समीकरण महाराष्ट्रात बसवणे कितीही कठीण वाटले तरी ते गणित राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला सोडवावेच लागेल आणि त्यात राजकीय पूर्वानुभव लक्षात घेता राष्ट्रवादीचे नेतृत्व नापास होण्याची दाट शक्यता आहे!!

    Drawing political equation between supriya sule and ajit pawar very difficult for NCP leadership

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!