सर्वाच्च न्यायालयाने क्रिप्टाेकरन्सीच्या एका गुन्हयात महत्वपूर्ण निर्णय देत, आराेपीचे डिजीटल वाॅलेट निष्पन्न झाल्यावर त्याबाबतची क्रिप्टाेवाॅलेटची गाेपनीय माहिती जसे की, युजरनेम, पासवर्ड तपासयंत्रणाना द्यावे लागणार आहे असे आदेश दिले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : क्रिप्टाेकरन्सी गुन्हयात तांत्रिक गाेष्टींचा तपास करत आराेपींचे वेगवेगळया क्रिप्टाेकरन्सी बाबतचे डिजीटल वाॅलेट शाेधणे आणि त्याचा तपास करणे तपास यंत्रणांच्या दृष्टीने काैशल्यपूर्ण काम असते. मात्र, अशा गुन्हयात आराेपी चाैकशीला सहकार्य करत नसल्याने पाेलीसांना विविध अडचणींचा सामना करावा लागत हाेता. मात्र, साेमवारी सर्वाच्च न्यायालयाने क्रिप्टाेकरन्सीच्या एका गुन्हयात महत्वपूर्ण निर्णय देत, आराेपीचे डिजीटल वाॅलेट निष्पन्न झाल्यावर त्याबाबतची क्रिप्टाेवाॅलेटची गाेपनीय माहिती जसे की, युजरनेम, पासवर्ड तपासयंत्रणाना द्यावे लागणार आहे. Supreme court order In cripto currency fraud case accused give details cripto wallet account username, password to investigation agency
सर्वाच्च न्यायालयान गेनबीटकाॅईन गुन्हयातील घाेटाळयातील आराेपी अजय भारद्वाज याला त्याच्या क्रिप्टाेवाॅलेट बाबतची गाेपनीय माहिती अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांना द्यावी. ईडीच्या वतीने सर्वाच्च न्यायालयात बाजू मांडताना अतिरिक्त साॅलीसटर जनरल ऐश्वर्या भाटी म्हणाल्या, क्रिप्टाेकरन्सी कायदेशीर आहे की नाही यासंर्दभातील हा विषय नसून आराेपीच्या डिजीटल खात्याचे युजरनेम व पासवर्ड हे तपासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. त्यानुसार सर्वाच्च न्यायालयाचे बेंचचे प्रमुख न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी आराेपीला तपास यंत्रणाना सहकार्य करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे क्रिप्टाेवाॅलेटचा युजरनेम व पासवर्ड देऊन त्याबाबतची सर्व माहिती तपास यंत्रणाना द्यावी असे सांगितले आहे.
अजय भारद्वाज याने न्यायालयात त्याच्या विराेधातील केस रद्द करण्यात यावी याबाबतची याचिका दाखल केली असून त्यासंर्दभातील सुनावणी दरम्यान न्यायालयाने सदर आदेश दिले आहे. अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज आणि अमित भारद्वाज या तीन भावांनी मिळून गुंतवणुकदारांना साखळी पध्दतीने माेठया प्रमाणात क्रिप्टाेकरन्सीत गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून त्यांची काेटयावधी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला बीटकाॅईन सारखी क्रिप्टाेकरन्सी कायदेशीर आहे की नाही यासंर्दभात ठाेस निर्णय घेण्याबाबत विचारणा केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा तपासाचा फायदा
पुणे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पाेलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, आराेपी अजय भारद्वाज आणि त्याच्या दाेन भावां विराेधात पुण्यात दत्तवाडी व निगडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अजय भारद्वाज अटकपूर्व जामीन मिळाल्याने सध्या बाहेर दिल्ली येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे. सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयामुळे काैशल्यपूर्व तपास करण्यास पाेलीसांना मदत मिळणार आहे.तसेच यापुढील गुन्हयांचा तपास करताना सदर निर्णय मार्गदर्शक स्वरुपात उपयाेगी हाेईल. आराेपी त्यांचे डिजीटल खात्याचे युजरनेम, पासवर्ड सांगत नसल्याने तपासात अडथळे येत हाेते मात्र, यापुढे आराेपींना अशाप्रकारे क्रिप्टाेवाॅलेटचे माहिती न दिल्यास त्यांना जामीन मिळण्यास अडचणी निर्माण हाेऊ शकतील. आराेपी जाणीवपूर्वक क्रिप्टाेवाॅलेट खात्याची माहिती पाेलीसांना देण्याचे टाळत हाेते आता यापुढील काळात त्यास लगाम बसेल अशी अपेक्षा आहे.
रवींद्र पाटीलकडे मिळाले ट्रेजर वॉलेट
पुण्यातील बिटकॉइन घोटाळ्यात अटक करण्यात आलेला माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांच्या घर झडतीत पोलिसांना एक ट्रेजर वॉलेट मिळून आले आहे. सदरचे ट्रेजर वॉलेट हे क्रिप्टो करन्सी साठवून ठेवण्यासाठी वापरले जाते. ट्रेजर वॉलेट ओपन करण्यासाठी पीन आणि पासवर्ड असणे आवश्यक असते. अटक आरोपी रवींद्र पाटील यांच्याकडे आतापर्यंत केलेल्या तपासात यास सदर खात्या बाबत विचारणा केली असता, त्याने पाच वेळा चुकीचा पिन क्रमांक सांगून पोलिसांची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे सदर ट्रेजर खात्या मधील मालमत्ता पोलिसांना अद्याप जप्त करता आलेली नाही. त्याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप यातील डाटा क्लोनिंग करून त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे.
Supreme court order In cripto currency fraud case accused give details cripto wallet account username, password to investigation agency
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Electricity Workers Strike : महाराष्ट्राला अंधाराचा धोका; वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर, उर्जामंत्र्यांसमवेत आजची बैठक रद्द!!
- सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ
- युक्रेनचा रशियाशी तुर्कीमध्ये या आठवड्यात संवाद समोरासमोर चर्चा ही एक संधी; परिस्थिती खूप बिघडली
- तेलंगणात साकारले भव्य यदाद्री मंदिर , शिखर मढविले १२५ कोटीचा सोन्याने; १२०० कोटींचा खर्च