विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Sunetra pawar मूळच्या पवार नसलेल्या सुनेत्रांना राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांच्या बंगल्यासमोरचाच, पण त्यांच्यापेक्षा भारी बंगला अलॉट झाला आहे. सुनेत्रा पवार राज्यसभेच्या फर्स्ट टाइम खासदार आहेत, पण त्यांना ल्यूटन्स दिल्ली मधला “कॅटेगिरी 2” चा बंगला अलॉट होणे याला वेगळे महत्त्व आपोआप निर्माण झाले आहे.Sunetra pawar
दिल्लीत शरद पवार हे सोनिया गांधींच्या “10 जनपथच्या” लाईन मध्ये “6 जनपथ” या बंगल्यात राहतात. खासदार सुप्रिया सुळे देखील त्याच बंगल्यात राहतात. आता सुनेत्रा पवारांना शरद पवारांच्या बंगल्यासमोरचा “11 जनपथ” हा बंगला अलॉट झाला आहे. अजित पवार कालच्या दिल्ली दौऱ्याच्या आधी या बंगल्याची पाहणी करण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर आले होते.
सुनेत्रा पवारांना अलॉट झालेला “11 जनपथ” हा बंगला राज्यसभा पूल “कॅटेगिरी 2” अंतर्गत येतो येतो, म्हणजे राज्यसभेच्या हाऊस कमिटी अंतर्गत त्याच्या वाटपाचा अधिकारी येतो, तर शरद पवारांचा 6 जनपथ हा बंगला जनरल “कॅटेगिरी 3” मधला आहे, त्यामुळे त्याच्या वाटपाचा अधिकार शहर विकास मंत्रालयांतर्गत येतो.
सुनेत्रा या मूळच्या पवार नाहीत, असे शरद पवार प्रचारादरम्यान म्हटले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ताबडतोब त्यांची नियुक्ती राज्यसभेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून केली होती. त्यामुळे त्यांना दिल्लीत खासदार कोट्यातून बंगला मिळाला.
Sunetra pawar new bunglow allotted in delhi
महत्वाच्या बातम्या
- परभणीत संचारबंदी, इंटरनेटही बंद, दगडफेक-जाळपोळप्रकरणी 40 जण पोलिसांच्या ताब्यात, SRPF चे पथक दाखल
- मल्लिकार्जुन खरगे म्हणाले- धनखड हेडमास्तर, प्रवचन देतात; विरोधी पक्षनेत्यांच्या बदनामीची संधी सोडत नाहीत, अविश्वास प्रस्तावास भाग पाडले
- Ladki Bahin Yojna मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बदलांच्या सोशल मीडियात अफवा; प्रशासनाचा स्पष्ट खुलासा!!
- Sambhal : संभल हिंसाचार प्रकरणी पोलिसांची कारवाई तीव्र