• Download App
    महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर|Sunburn; Heat wave to hit Vidarbha Mercury at 40 degrees Celsius in most places in Maharashtra

    महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदले आहे. 29 मार्चनंतर राज्यात उष्णतेची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. Sunburn; Heat wave to hit Vidarbha Mercury at 40 degrees Celsius in most places in Maharashtra

    हवामान विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. आज आणि उद्या बुलडाणा, अकोला जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 29 आणि 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेची लाट धडकणार आहे. .



    31 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांना उन्हापासून किंचितसा दिलासा मिळणार आहे. जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या सहा जिल्ह्यांत उन्हाचा प्रकोप कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातील कमाल तापमान 35 ते 40 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

    आज सकाळपासून मध्य आणि वायव्य भारतात अनेक ठिकाणी वेगवान वारे वाहत होते. काही भागात उष्णतेचा चटका असह्य झाला आहे. गुजरातसह हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढली आहे. मार्च अखेरीस विदर्भासह पश्चिम राजस्थान, दक्षिण हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेशात सूर्य प्रकोप होण्याची शक्यता आहे.

    येत्या तीन दिवसांत पश्चिम हिमालयातील काही भागासह गुजरातमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात पश्चिम मध्यप्रदेश, विदर्भ आणि राजस्थानात उन्हाचा चटका वाढणार आहे.

    Sunburn; Heat wave to hit Vidarbha Mercury at 40 degrees Celsius in most places in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस