• Download App
    सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरूच ; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं पालकत्व Sumant Ruikar's family continues to receive help; Urban Development Minister Eknath Shinde accepted guardianship

    सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरूच ; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं पालकत्व

     

    शिवसेना नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची पाच लाख रुपयांची तात्पुरती मदत काल मंगळवारी रुईकर कुटुंबीयांकडे पोहच केली.Sumant Ruikar’s family continues to receive help; Urban Development Minister Eknath Shinde accepted guardianship


    विशेष प्रतिनिधी

    बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वास्थ्य लाभावे, यासाठी बीड ते तिरूपती पायी वारी करताना रस्त्यातच मृत्युमुखी पडलेल्या सुमंत रुईकर यांच्या उघड्यावर आलेल्या कुटुंबीयांना शिवसेनेने मोठा आधार दिला.

    शिवसेना नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची पाच लाख रुपयांची तात्पुरती मदत काल मंगळवारी रुईकर कुटुंबीयांकडे पोहच केली.आठवडाभरात एकनाथ शिंदे हे रुईकर कुटुंबीयांना भेटण्यासाठी बीडमध्ये दाखल होणार आहेत.



    तत्पूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलवरून रुईकर कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.यावेळी या संपूर्ण कुटुंबाचे पालकत्व आपण स्वीकारत आहोत.तसेच पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्ष भेटीला येऊ, त्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम करून देऊ, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला.

    Sumant Ruikar’s family continues to receive help; Urban Development Minister Eknath Shinde accepted guardianship

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती