• Download App
    मराठवाड्यात ऊस लागवड वाढली, ऊस गाळपासाठी आवश्यक असलेल्या साखर कारखान्यांच्या संख्येतही वाढ|Sugarcane cultivation increased in Marathwada, and the number of sugar mills required for sugarcane crushing also increased

    मराठवाड्यात ऊस लागवड वाढली, ऊस गाळपासाठी आवश्यक असलेल्या साखर कारखान्यांच्या संख्येतही वाढ

    विशेष प्रतिनिधी

    मराठवाडा : मराठवाडा म्हटलं की दुष्काळी भाग हेच आपल्या डोळ्यासमोर येते. पण अलिकडे ही परिस्थिती बदलली आहे. मागील 3-4 वर्षांपासून होत असलेल्या पावसामुळे येथील चित्र बदलले आहे. उसाच्या लागवडीमध्ये आणि ऊस गाळपासाठी आवश्यक असलेल्या साखर कारखान्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ झालेली आहे.Sugarcane cultivation increased in Marathwada, and the number of sugar mills required for sugarcane crushing also increased

    मराठवाड्यामध्ये एकूण 55 साखर कारखान्यांनी 66 लाख टन उसाचे गाळप केले आहे. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन आता अडीच महिन्यांचा कालावधी झालेला आहे. तर या प्रक्रियेतून 80 लाख क्विंटल साखरेचे उत्पन्न झालेले आहे.



    याआधी मराठवाड्यातील उस्मानाबाद परांडा या भागातील उसाचे गाळप हे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर अवलंबून असायचे. तर आता या विभागामध्ये एकूण 55 साखर कारखाने आहेत. यामध्ये सर्वाधिक 12 कारखाने हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत.

    Sugarcane cultivation increased in Marathwada, and the number of sugar mills required for sugarcane crushing also increased

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

    Fadnavis : “काँग्रेसच्या नेतृत्वात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य विसरता येणार नाही”; शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

    Shaktipitha Highway : रक्त सांडू, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही!; कोल्हापुरात विराट एल्गार, हजारो शेतकरी-महिलांचा सरकारविरोधात मोर्चा