विशेष प्रतिनिधी
नागपूर : लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दिसल्यानंतर अंगात स्वबळ शिरलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक घेऊन विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवण्याचा दावा केला, त्या नंतरच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्या म्हणजे महाविकास आघाडी जिंकेल, अशा शब्दांमध्ये डिवचले.Sudhir mungantiwar targets sharad pawar over his remarks on Modi rallies
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडून त्यांच्या पक्षाचे वाभाडे काढले. 8 खासदारांचे नेते 240 खासदार असलेल्या मोदींची स्पर्धा करायला निघालेत, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना हाणला. शरद पवारांच्या पक्षाने महाराष्ट्रात फक्त 10 जागा लढवल्या त्यापैकी 8 जागा निवडून आल्या. कुठल्याही शर्यतीत कासव एकदाच जिंकते बाकी वेळेला ससा जिंकत असतो. आज पत्रकार परिषदेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणे म्हणजे आधीच 7 अजुबे होते, पवारांचे हे आव्हान म्हणजे आठवा आजूबा आहे, अशा शब्दांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांच्या आव्हानाची खिल्ली उडवली.
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी मोदींना महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घेण्याचे आव्हान दिले. जिथे मोदींनी सभा घेतल्या तिथे भाजप हरला, असा दावा पवारांनी केला. मात्र, हा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी आकड्यासह खोडून काढला. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त 10 जागा लढवून त्यातले आठच जागा मिळवल्यात अशा शब्दांमध्ये मुनगंटीवार यांनी पवारांना टोचले.
Sudhir mungantiwar targets sharad pawar over his remarks on Modi rallies
महत्वाच्या बातम्या
- टीकेची झोड उठली तरी अजितदादांना सोडवेना सत्तेची वळचण; पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजितदादांची पाठराखण!!
- POCSO प्रकरणात येडियुरप्पा यांच्या अटकेला कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली स्थगिती!
- रोहिंग्या, बांगलादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही
- काश्मीरच्या आजादीची वकिली केल्याबद्दल अर्बन नक्षल अरुंधती रॉय वर UAPA अंतर्गत खटला चालणार!!