• Download App
    7 खासदारांच्या नेत्याला पंतप्रधान सोडा, गृहमंत्री देखील होता येत नाही, तेव्हाच...!! Sudhir mungantiwar targets sharad pawar over his dismissal political performance

    Sudhir mungantiwar targets sharad pawar : 7 खासदारांच्या नेत्याला पंतप्रधान सोडा, गृहमंत्री देखील होता येत नाही, तेव्हाच…!!

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आणि शरद पवार यांची छुपी युती संपूर्ण महाराष्ट्रासमोर “एक्सपोज” झाल्यानंतर पवारांनी महाराष्ट्रात लोकांशी संवाद साधण्याची भूमिका जाहीर केली, पण त्याचवेळी शिंदे – फडणवीस सरकारच्या चुका काढल्या. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन वगैरे नेत्यांनी आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही. लपून छपून काही करत नाही जे करायचे ते उघड करतो. शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, अशा शब्दांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून पवारांच्या भूमिकेचे वाभाडे काढले. Sudhir mungantiwar targets sharad pawar over his dismissal political performance

    पण पवारांनी दुसऱ्या एका पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्यावर टीका करताना त्यांनी कोणता दिवा लावला आणि तो गुजरात मधून तडीपार झालेला दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात कसा होता हे आम्ही पाहिले आहे, असे शरसंधान साधले होते. अमित शाह यांनी पुण्यातल्या भाजप मेळाव्यात शरद पवारांना “भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार” म्हटले होते. त्याला पवारांनी “तडीपार दिवा गृहमंत्री म्हणून बसलेत”, असे प्रत्युत्तर दिले. मात्र राज्याचे आणखी एक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांचा सगळा अपयशी राजकीय इतिहास काढून त्यांना प्रत्युत्तर दिले.



    सुधीर मुनगंटीवार म्हणाले :

    • पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहणारा नेता जेव्हा देशाचा गृहमंत्री देखील होऊ शकत नाही, तेव्हा त्या व्यक्तीच्या दुःख आणि व्यथा अशा शब्दांमधून बाहेर येत राहतात.
    • जनता एखाद्या नेत्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देत नाही. त्याचा स्वप्नाला तडीपार करते. माननीय साहेब पंतप्रधान बनणार , माननीय साहेब पंतप्रधान बनणार, असे त्यांचे समर्थक म्हणत राहतात, पण ते पंतप्रधान होण्याचे तर सोडा, देशाचे गृहमंत्री पण होऊ शकले नाहीत, याचे दु:ख आणि वेदना इतरांचा अनादर करण्याच्या शब्दांत व्यक्त होतो.
    • 7 खासदारांच्या भरवश्यावर आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नेते व्हायचा प्रयत्न करतो, पण तेवढ्या भरवश्यावर नेता होता येत नाही. तसल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. मग एखाद्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या नेत्याबाबत तडीपार दिवा वगैरे वक्तव्य करण्यात नैतिकता नाही.
    • मराठा आरक्षणावर सरकारने थेट चर्चा करण्यापूर्वी तुमची भूमिका काय आहे ते सांगा. तुमची भूमिका मराठा आरक्षण देण्याची नव्हती, आता तुमची भूमिका बदलली तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी सांगायला पाहिजे. स्वतंत्र आरक्षण द्यायचे की ओबीसींमधून आरक्षण द्यायचे?? जर त्यांचा खरा चेहरा समोर आला महाविकास आघाडीचे सगळे नेतेच अडचणीत येतील.

    Sudhir mungantiwar targets sharad pawar over his dismissal political performance

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस