• Download App
    शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसवणार, कृषिमंत्री अब्दुल सत्तार|Study Committee on Conch Snail Infestation, Loss of Soybean, Prime Minister to Include in Crop Insurance Rules, Agriculture Minister Abdul Sattar

    शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसवणार, कृषिमंत्री अब्दुल सत्तार

    प्रतिनिधी

    लातूर : शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढीपर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून,ती लवकरच यावर उपाययोजनेसाठी योग्य तो निर्णय देईल. हे एनडीआरएफच्या कक्षेत बसत नसले तरी केंद्राकडे पाठपुरावा करु तसेच पंतप्रधान पीक विम्याच्या कक्षेत कसे बसवता येईल आणि अधिकाधिक मदत कशी देता येईल याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्यांच्या सोबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार होते.Study Committee on Conch Snail Infestation, Loss of Soybean, Prime Minister to Include in Crop Insurance Rules, Agriculture Minister Abdul Sattar

    काल औसा तालुक्यातील एरंडी आणि जय नगर येथील शिवरातील प्रादुर्भाव झालेल्या शेतीची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.



    यावेळी माजी मंत्री आ. संजय बनसोडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर, कृषी विभागाचे सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, विभागीय जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र पाटील उपस्थित होते.

    एरंडी गावाच्या शिवारात कृषी मंत्री गेले असताना, शंखी गोगलगाय गोळा केलेल्या ठिकाणी थांबून, ती सोयाबीन कशी खाते याबाबत त्यांनी सांगितले. आ. अभिमन्यू पवार यांनीही शंखी गोगलगाय कशी सोयाबीन फस्त करते याची चित्रफितही दाखविली.

    आपण अनेक जिल्ह्याचा दौरा करून आलो असून याबाबत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना याबाबत अवगत करणार असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

    Study Committee on Conch Snail Infestation, Loss of Soybean, Prime Minister to Include in Crop Insurance Rules, Agriculture Minister Abdul Sattar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस