• Download App
    Strict action against those running dance bars under the name of Orchestra Bar; Chief Minister assures in the Assembly ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

    ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

    Chief Minister

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ग्वाही दिली.Strict action against those running dance bars under the name of Orchestra Bar; Chief Minister assures in the Assembly

    विधानसभेत भास्कर जाधव यांनी पनवेल मधल्या डान्सबारच्या प्रकरणांचा उल्लेख केला त्यांच्यावर कठोर कारवाई करायची मागणी केली‌‌. सगळ्या विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा ही मागणी उचलून धरली.



    आमदारांच्या या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या डान्सबारची कायदेशीर परिस्थिती समजून सांगितली. महाराष्ट्र विधानसभेने तीन वेळा डान्सबार विरोधी कायदा केला. मात्र सुप्रीम कोर्टाने कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली किंवा त्या बेकायदा ठरविल्या. परंतु महाराष्ट्र विधानसभेने वेगवेगळ्या सरकारच्या काळात डान्सबार विरोधात कठोर कायदे केले सध्या त्या कायद्याची अंमलबजावणी सुरूच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारची परवानगी आहे. त्या बारमध्ये महिलांना सुद्धा काम करण्याची परवानगी आहे, पण तिथे कोणी डान्सबार चालवला आणि पैसे उधळण्याचे प्रकार झाले, तर मात्र त्या प्रकारांना कायदेशीर बंदी आहे. कारण सुप्रीम कोर्टाने या प्रकारांची बंदी उठवलेली नाही. पनवेल सारख्या ठिकाणी आर्केस्ट्रा बारच्या नावाखाली जर डान्सबार सुरू असतील, तर सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. बारचालक वारंवार कायद्याचे उल्लंघन करून डान्सबार चालवत असतील तर त्यांचे लायसन्स कायमचे रद्द करण्याची सुद्धा तरतूद करता येऊ शकेल त्यासंदर्भात विधानसभेने जरूर विचार केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    Strict action against those running dance bars under the name of Orchestra Bar; Chief Minister assures in the Assembly

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ग्रेटर निकोबार प्रकल्पासंदर्भात लिबरल मीडियाकडून जनसामान्यांचा बुद्धिभेद; नेमके वास्तव काय??

    लॅपटॉप टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी फडणवीस सरकारचे प्रोत्साहन, 600 कोटींच्या गुंतवणुकीचा करार, रोजगार निर्मितीवर भर

    महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळेना, पण संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बांधल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या!!