• Download App
    मिरज कोल्हापूर एसटीवर अज्ञातांनी केली दगडफेक | Stones were hurled at Miraj Kolhapur ST by unknown persons

    मिरज कोल्हापूर एसटीवर अज्ञातांनी केली दगडफेक

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : राज्यात सर्वत्र एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर कोल्हापूरमधील एकूण 53 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानिमित्त कर्मचारी आधीपासूनच संतप्त आहेत. कर्मचार्यांनी एसटी डेपोमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जेणेकरून सरकारला सुबुद्धी यावी.

    Stones were hurled at Miraj Kolhapur ST by unknown persons

    तर आता आणखी एका माहितीनुसार कोल्हापूर सांगली रोडवर मिरज कोल्हापूर एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. ही दगडफेक करून हल्लेखोर पळून गेले आहेत. या दगडफेकीमध्ये एसटीचे चालक मात्र जखमी झालेले आहेत. एसटी चालकांवर उपचार सुरु असून लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. ही घटना घडल्यानंतर शिरोली MIDC पोलिस ठाण्यातील आणि हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.


    निजामशाहीमुळे ST कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याला ठाकरे सरकार जबाबदार राहील – आमदार गोपीचंद पडळकर


    जिल्ह्यातील सर्व आगारातील एसटी सेवा बंद असून प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा वापर करून होताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज या बसवर झालेला हल्ला हा अतिशय दु खद आहे.

    Stones were hurled at Miraj Kolhapur ST by unknown persons

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karuna Munde : धनंजय मुंडेंना मंत्री केले, तर सत्ता जाणार; करुणा मुंडेंचा इशारा; ऑपरेशन मेंढीउ म्हणत एकनाथ शिंदेंना टोला

    Ashok Kharat : रूपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस; पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराचे प्रकरण

    Bombay High Court : पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा:न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले