• Download App
    एसटी कामगार संप; खासगी वाहतुकीला सरकारची परवानगी पण खासगी ट्रॅव्हल्सच्या लूटमारीला सरकारकडून पायबंद नाहीच!! । ST workers strike; The government has allowed private transport but the government has not stopped the looting of private travels !!

    एसटी कामगार संप; खासगी वाहतुकीला सरकारची परवानगी पण खासगी ट्रॅव्हल्सच्या लूटमारीला सरकारकडून पायबंद नाहीच!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात एसटी कामगारांचा संप सुरू असताना राज्य सरकारने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे पण खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अक्षरशः प्रवाशांची लूटमार चालवली आहे. तिप्पट – चौकट भाडे आकारले जात आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार सुरू असताना राज्य सरकार मात्र त्याला पायबंद घालताना दिसत नाही. ST workers strike; The government has allowed private transport but the government has not stopped the looting of private travels !!

    दिवाळीला गावाला गेलेले किंवा गावावरून मुंबईला आलेल्या हजारो प्रवाशांनी आता खासगी ट्रॅव्हल्सची वाट धरली आहे पण त्यांना तिप्पट-चौपट पैसे मोजून घरी परतण्याची परतावे लागत आहे त्यामुळे अक्षरशः मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय यांचे बजेट कोलमडले आहे.

    राज्यात आज मंगळवारी देखील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सर्व स्थानकांवर खाजगी गाड्या लागल्या आहेत. पण त्यांच्या भांड्यांवर सरकारचे नियंत्रण नाही किंबहुना खासगी ट्रॅव्हल्सवाले गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांकडून प्रचंड भाडे उकळत असताना त्यावर सरकारने कोणतीही प्रतिबंधात्मक उपाय योजनाही केल्याचे दिसत नाही. उलट आता उघडपणे सरकारने परवानगी दिल्यानंतर खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांची मनमानी वाढताना दिसत आहे.



    पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अमरावती, अकोला, वाशिम, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, मालवण या शहरातून संप चिघळल्याच्या बातम्या येत आहेत.

    राज्यभरात २२० डेपोंमध्ये एसटीच्या गाड्या उभ्या आहेत. सोमवारी सकाळपासून एसटीचा शंभर टक्के संप सुरु झाला आहे. त्याचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी लागलीच घेतला आणि काही तासांत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले. त्यामुळे सर्व सामान्यांची गैरसोय केली आहे. विशेष म्हणजे एकदा खरेदी केलेले तिकीट पुन्हा रद्द करता येणार नाही, अशी दटावणी करूनच ट्रॅव्हल्सवाले तिकिटांचे आरक्षण करू लागले आहेत. पुणे मुंबईहून सातारा, कोल्हापूर, जळगाव या भागात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकीट दर भरमसाठ वाढवले आहेत.

    संप चालेल तसे दर वाढणार

    प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सवाले थेट सांगत आहेत की, आजचे दर आणि  उद्याचे दर वेगळे असू शकतात, सध्या एसटीचा संप सुरु आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे दर वाढवत आहेत. उद्याही संप सुरु राहिला तर तिकीट दर आणखी वाढलेले असतील, असे ट्रॅव्हल्सच्या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण करणारे एजंट सांगत आहेत. राज्य सरकार मात्र या भरमसाठ भाडेवाढीवर कोणताही उपाय करताना दिसत नाही.

    असे आहेत दर

    आताचे दर आणि कंसात पूर्वीचे दर

    बोरिवली ते महाबळेश्वर     एसी सीटिंग ७०० (५००)

    बोरिवली ते महाबळेश्वर     एसी स्लीपर १५०० (११००)

    बोरिवली ते जळगाव         एसी सीटिंग १३०० (९००)

    बोरिवली ते जळगाव        एसी स्लीपर  २००० (१५००)

    बोरिवली ते कोल्हापूर       एसी सीटिंग  ९०० (६००)

    बोरिवली ते कोल्हापूर       एसी स्लीपर  १७०० (१३००)

    ST workers strike; The government has allowed private transport but the government has not stopped the looting of private travels !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!