विशेष प्रतिनिधी
जळगाव : राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) शासनात विलीनीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुक्ताईनगरसह जळगाव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अनेक आगारांतील बसची चाके पुन्हा जागच्या जागीच थांबली आहेत.ST workers strike continues
बस वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींची झळ बसत आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त गावी येणाऱ्या व कामावर परतणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना प्रवासासाठी कसरत करावी लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
मात्र आमच्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या.
- एसटी कर्मचाऱ्यांचा संपता संपेना…
- एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याचा आग्रह
- कोण म्हणते देत नाही, कर्मचाऱ्यांच्या घोषणा
- बस वाहतूक ठप्प झाल्याने कोट्यवधीची झळ
- कामावर परतणाऱ्यांची मोठी गैरसोय
- प्रवाशांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे
ST workers strike continues