विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं एल्गार पुकारण्यात आला आहे.ST workers’ agitation, warning of disciplinary action against participants
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उचलल आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं एल्गार पुकारण्यात आला आहे.
त्यामुळे एसटीची सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.दरम्यान, उपोषणात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
१) एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे
२) पगार वेळेत मिळावा
३)रखडलेली देणी लवकर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दरम्यान, पाच टक्के महागाई भत्तात वाढ, अडीच हजार रुपये दिवाळी भेटीची घोषणा एसटी महामंडळाने केल्यानंतरही त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान यावेळी जर एसटी सेवा कोलमडल्यास उपोषणात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असं परिपत्रकच एसटी महामंडळाने काढले आहे.
ST workers’ agitation, warning of disciplinary action against participants
महत्त्वाच्या बातम्या
- फर्जीवाडा ! आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईलने दाखवलेला तो ‘सॅमचा’ फोटो पालघर येथील व्यापारी हनिक बाफनाचा ; व्हाट्स ॲप डीपीचा दुरूपयोग;तक्रार दाखल ..
- SARDAR UDHAM SINGH : ‘सरदार उधम’ चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष पसरवणारा;अनपेक्षित कारण देत ऑस्करच्या यादीतून वगळलं ; भारतीय संतापले
- Jyotiraditya Scindia : राजघराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू ! केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली स्वच्छता..व्हिडिओ व्हायरल
- WHO द्वारे कोवॅक्सिनला मंजूरी नाही ; याबाबत अधिक माहिती विचारली , ३ नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल