• Download App
    यंदाही आषाढीला संतांच्या पालख्या पंढरीला नेण्याचा मान लालपरीलाच|ST will participate in Ashadhi Wari

    यंदाही आषाढीला संतांच्या पालख्या पंढरीला नेण्याचा मान लालपरीलाच

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाचे सावट कायम असल्याने यंदाही आषाढी वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील दहा मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीच्या लालपरीला मिळाला आहे.ST will participate in Ashadhi Wari

    वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा; तसेच हा पालखी सोहळा नेत्रदीपक होण्यासाठी एसटी महामंडळ बसची सुविधा पुरवणार आहे. या गाड्या पालख्यांबरोबर १९ जुलै रोजी पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांनांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.



    यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी त्यांच्या जिल्ह्यातील संस्थान, विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यांसाठी एसटी महामंडळाच्या बस उपलब्ध करीत असल्याबद्दल आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून दिल्या आहेत.

    कोरोनाच्या संकटातही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या दहा पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.

    ST will participate in Ashadhi Wari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ