• Download App
    एसटी संप : बुलडाण्यातील विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू , एसटी कर्मचारी आत्महत्त्या संख्येत पडली भरST strike: Death of ST employee who ingested poison in bulldozer, ST employee suicide rate rises

    एसटी संप : बुलडाण्यातील विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू , एसटी कर्मचारी आत्महत्त्या संख्येत पडली भर

    कामगारांच्या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे. एसटी कर्मचारी पुन्हा टोकाचं पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट होत आहे.ST strike: Death of ST employee who ingested poison in bulldozer, ST employee suicide rate rises


    विशेष प्रतिनिधी

    खामगाव : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नाही. कामगारांच्या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे. एसटी कर्मचारी पुन्हा टोकाचं पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट होत आहे.

    एसटी संपाचा आज बारावा दिवस आहे. एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी १२ दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानावर अजूनही आंदोलन सुरु आहे.दरम्यान काल संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे.



     

    तसेच दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली असून २४ तासात कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत बऱ्याच एसटी कामगारांच्या आत्महत्या केल्या आहेत.दरम्यान हे आत्महत्येच सत्र अजूनही थांबत नाहीय.

    तसेच काल रात्री राज्यातील एसटी कर्मचारी आत्महत्येत पुन्हा एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची भर पडली आहे. खामगाव येथील एसटी डेपोत मॅकेनिकने काल रात्री विष प्राशन केले होते.या कर्मचाऱ्याचे नाव विशाल अंबालकर असे आहे.

    विष पिल्यानंतर त्याला तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती जास्तच गंभीर झाल्याने तातडीने रात्री उशिरा अकोला येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने विशाल अंबालकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

    ST strike: Death of ST employee who ingested poison in bulldozer, ST employee suicide rate rises

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!