विशेष प्रतिनिधी
बीड : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज चक्क सामूहिक मुंडन करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.ST staff aggressive; Mass shaving in beed of heads
आज पुरुष मुंडन करत आहेत. जर शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या महिला देखील मुंडन करतील. एवढे करूनही जर राज्य शासनाला जाग येत नसेल तर शेवटी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला.
- एसटी कर्मचारी आक्रमक; बीडमध्ये सामूहिक मुंडन
- सामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा
- गेल्या सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन
- एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करण्याची मागणी
- सामूहिक आत्मदहन करू, अखेरचा इशारा
ST staff aggressive; Mass shaving in beed of heads