विशेष प्रतिनिधी
सांगली : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला दिवसेंदिवस भयानक रूप प्राप्त होत चालले आहे. आंदोलकांच्या तीन मागण्या मान्य केल्या असल्या तरी विलीनीकरणाच्या त्यांच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक विशेष समिती ची स्थापना केलेली आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांची देखील बरीच गैरसोय होताना दिसून येत आहे.
ST employees death in Sangli who participated in the agitation is raising anger
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे या प्रकरणाला अतिशय भयानक रूप प्राप्त झाले आहे. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. यानुसार सांगली जिह्यातील कवलापूर येथे राहणार्या राजेंद्र निवृत्ती पाटील वय वर्ष 46 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे.
सांगलीमधील कर्मचारयांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता. पहिल्या दिवसापासून पाटील यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. पण मागील तीन दिवसांपासून ते अांदाेलन मध्ये सहभागी होण्यास गेले नव्हते. लांबत चाललेल्या आंदोलनामुळे ते आपल्या नोकरी बाबत प्रचंड तणावाखाली होते. असे नातेवाईकांनी सांगितले आहे. आणि या ताणतणावामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
एस टी कर्मचार्यांच्या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर अशा बऱ्याच घटना समोर येण्याची शक्यता आहे. असे भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
ST employees death in Sangli who participated in the agitation is raising anger
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल