• Download App
    पिताश्रींच्या छत्रछायेतील राजकीय कर्तृत्वाच्या "बोलक्या" महत्त्वाकांक्षा फलद्रूप होतील?? spoken ambitions of the political elite under the umbrella of the fathers

    महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री : पिताश्रींच्या छत्रछायेतील राजकीय कर्तृत्वाच्या “बोलक्या” महत्त्वाकांक्षा फलद्रूप होतील??

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या तरी स्थिर आहे. तरी देखील अनेकांच्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा “बोलक्या” झाल्या आहेत!! त्यातही आपापल्या वडिलांच्या राजकीय छत्रछायेखाली वाटचाल करणाऱ्या दोन महिला नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा विशेष “बोलक्या” ठरल्या आहेत. spoken ambitions of the political elite under the umbrella of the fathers

    – पंकजा मुंडे यांची महत्त्वाकांक्षा

    लोकमतच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेवर भाष्य केले आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे वाक्य मूळात मी उच्चारले नव्हते. पण हे वाक्य उच्चारले म्हणून असे काय मोठे आकाश कोसळले होते?, असा सवाल त्यांनी करून मनातला सलच उलगडून दाखवला आहे. मुख्यमंत्रीपदाचा विषय काढून एक प्रकारे पंकजा मुंडे यांनी आपली महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा जाहीर करून घेतली आहे.

    त्या सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारण करताना तशाही त्या संभाजीनगरच्या लोकल प्रश्नांमध्ये लक्ष घालत नाहीत हे खुद्द त्यांचेच विधान आहे. त्यामुळेच संभाजीनगर मध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जल आक्रोश मोर्चा मध्ये पंकजा मुंडे सहभागी नव्हत्या. लोकल नेत्यांनी काढलेला तो मोर्चा होता. मी सध्या राष्ट्रीय राजकारणात आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा विषय लोकमतच्या मुलाखतीत काढून त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा बोलून दाखवली.



    – सुप्रिया सुळे यांची महत्त्वाकांक्षा

    जे पंकजा मुंडे यांचे तेच सुप्रिया सुळे यांचे तुळजापूरच्या दौर्‍यात त्यांनी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री या विषयावर आपले मत मांडले. कोणालाही मुख्यमंत्री करणे हे जनतेच्या हातात आहे. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर सगळ्या पक्षाला घेऊन नवस फेडायला येईन, असे वक्तव्य त्यांनी करून स्वतःची देखील महत्त्वाकांक्षा एक प्रकारे जाहीर केली आहे.

    – बोलक्या महत्वाकांक्षी पाळतात??

    महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकीय इतिहास पाहिला तर महत्त्वाकांक्षा उघडपणे आपल्या तोंडून बोलणारे फार क्वचित प्रसंगी सर्वोच्च पदावर चढलेले दिसतात. खुद्द गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा होती. पण त्यांनी ती फारशी कधी उघडपणे बोलून दाखवली नव्हती.

    इतकेच काय दस्तुरखुद्द शरद पवारांना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे. पण ती फक्त 1991मध्ये त्यांनी ती बोलून दाखवली होती. त्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला तशी महत्त्वाकांक्षा नाही असेच ते पत्रकारांना सांगत असतात.

    महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची मुले मुख्यमंत्री झालीच नाहीत असे अजिबात नाही. अशोक चव्हाण यांचे उदाहरण यासाठी नजीकच्या इतिहासात घडले आहे. पण शंकरराव चव्हाण यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन असा शब्द दिला होता, असे सांगत स्वतः उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदावर बसले आहेत. पण त्यांनी स्वतःची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवलेली नव्हती. हा मुद्दा येथे अधोरेखित करावासा वाटतो. अशोक चव्हाण काय किंवा उद्धव ठाकरे काय हे आपापल्या पक्षांचे त्या त्या वेळचे प्रमुख नेते आहेत. पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत सध्या तसे आहे का?? त्या अजूनही आपल्या पिताश्रींच्या राजकीय छत्रछायेतच वावरत आहेत ही वस्तुस्थिती नाही का?? मग अशा स्थितीत नुसती महत्त्वाकांक्षा बोलून स्वतःचे स्वतंत्र राजकीय कर्तृत्व कसे सिद्ध होईल??, हा प्रश्न येथे कळीचा ठरणार आहे.

    – महत्त्वाकांक्षा जाहीर करणे म्हणजे पद गमावणे

    राजकारणामध्ये जाहीररीत्या महत्वाकांक्षा बोलून दाखवणे कायमच पदे मिळवताना घातक ठरलेली आहे. मग अशा वेळी मूळातच ज्यांचे राजकीय कर्तृत्व मोठ्या नेतृत्वाच्या छत्रछायेखाली आहे म्हणजे एक प्रकारे कुंठित आहे त्यांच्या महत्त्वाकांक्षा नुसत्या बोलून कशा पूर्ण होतील?? हा कळीचा प्रश्न आहे.

    – पक्षांतर्गत विरोधाचा सामना कसा करणार??

    त्यातही महत्त्वाकांक्षा जाहीररीत्या बोलून दाखवल्यानंतर पक्षांतर्गत विरोधकांचा सामना तसेच पक्षबाह्य विरोधकांचा सामना अधिक तीव्रतेने करावा लागतो हा इतिहास आणि वर्तमान आहे. या विरोधाला बोलक्या महत्त्वाकांक्षा असणाऱ्या या नेत्यांना तोंड कसे देता येईल??, या प्रश्नाचे उत्तर देखील मिळणे अपेक्षित आहे.

    spoken ambitions of the political elite under the umbrella of the fathers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!