वृत्तसंस्था
पुणे: औंधमधील प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेच्या छळाला कारणीभूत ठरलेला ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूल याला कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली.
सुनेचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होणार नाही, असा सल्ला देऊन तिच्या छळाला येमूल कारणीभूत ठरल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
spiritual guru Yemul Guruji Is Arrested by pune police for women Persecution
तुझी पत्नी पांढर्या पायगुणाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार व मंत्रीही होणार नाही. त्यामुळे तिला लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा हा तिचेकडून काढून घे. तसेच मी देतो हे लिंबु उतरविल्यानंतर तुझ्या मागची ही पिडा कायमची निघून जाईल, असे गणेश गायकवाडला सांगितले होते. या भविष्यवाणीमुळेच केदार गायकवाडने पत्नीचा छळ केला. तिला सिगारेटचे चटके दिले. मारहाणीत तिला बहिरेपणा आला. छळ करुन त्यांना घराबाहेर काढले होते.
नानासाहेब व त्यांचा मुलगा गणेश ऊर्फ गायकवाड यांच्याविरुद्ध जमिनी बळकावणे, खंडणीचे हिंजवडी, सांगवी ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गणेश गायकवाड याने नुकताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदी नियुक्तीही केली आहे. सध्या गणेश गायकवाड गायब आहे.
कोण आहे रघुनाथ येमूल
- सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष
- स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात
- सोशल मिडियावर दिवसाचे शुभ मुहूर्त सांगतात
- ज्योतिषाचार्य म्हणून रघुनाथ येमूलची ख्याती
- हस्तरेषा पाहून ते भविष्य सांगतात
- कॉपोरेट क्षेत्रातही मोठा दबदबा आहे
- राजकीय नेते, अधिकारी यांचा राबता
महत्त्वाच्या बातम्या
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?
- लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल