• Download App
    Chief Minister भरधाव कारने १२ एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं;

    Chief Minister : भरधाव कारने १२ एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मदतीचे आश्वासन

    Chief Minister

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Chief Minister पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूलजवळ चहा पिण्यासाठी आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने चालवलेल्या कारने उडवले. Chief Minister

    प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्तांमध्ये तीन मुलींचाही समावेश आहे. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या संचेती रुग्णालय आणि मोडक हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. उर्वरित नऊ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

    संबंधित कारचालकाने दारूच्या नशेत वाहन चालवले होते, हे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली असून त्याच्यावर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.



    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून सर्व जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “ही अतिशय दुःखद घटना आहे. विद्यार्थी आपला अभ्यास करून स्पर्धा परीक्षा द्यायला सज्ज असताना असं दुर्भाग्य त्यांच्यावर कोसळणं दुर्दैवी आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

    स्थानिक आमदार हेमंत रासणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशाने रुग्णालय प्रशासनाला तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मानसिक आधार दिला. युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी या संवादासाठी पुढाकार घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देत, “शासन तुमच्यासोबत आहे. तुम्हाला जे काही आवश्यक असेल ती संपूर्ण मदत दिली जाईल,” असं आश्वासन दिलं.

    विशेष बाब म्हणजे, जखमी विद्यार्थ्यांपैकी काहीजण रविवारी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेस बसणार होते. परंतु सध्याच्या शारीरिक अवस्थेचा विचार करता, त्यांच्या परीक्षेबाबत विशेष निर्णय किंवा पर्यायी व्यवस्था करता येईल का, यावर उच्च पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मिळते.

    दरम्यान, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संबंधित चालकावर कठोर कारवाईसह वाहन चालकांवरील निर्बंध अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

    Speeding car hits 12 MPSC students; Chief Minister and Deputy Chief Minister assure help

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    काका – पुतण्याच्या महत्त्वाकांक्षांचे फुगेच मोठे; पण राजकीय कर्तृत्वात काटेच काटे!!

    बारामतीतून कर्जत जामखेड मध्ये “घुसलेल्या” रोहित पवारांची घसरण सुरूच, कर्जत दूध संघाची निवडणूक बिनविरोध राम शिंदेंचा रोहित पवारांना धोबीपछाड!!

    Sanjay Raut : ‘’ट्रम्प भारताच्या बाजूने का उभे राहिले नाहीत?’’