विशेष प्रतिनिधी
मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर एकीकडे वाग्बाण चालवले, तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक होत असताना त्यांचे नगरसेवक फोडण्याची रणनीती शिवसेनेने आखल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तर भाजप नगरसेवक फोडण्याचा “मुहूर्त” जाहीर केला आहे. Speech against BJP at Dussehra rally, then Shiv Sena’s attack on BJP corporators in Mumbai
भाजपचे महापालिकेतील नगरसेवक त्रस्त आहेत, डिसेंबरपर्यंत थांबा तुम्हाला भाजपचे नगरसेवक शिवसेनेत आल्याचे दिसतील, असा दावा यशवंत जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
भाजपच्या पालिकेतील वरीष्ठ नेत्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे भाजपचे अनेक नगरसेवक अक्षरश: कंटाळले आहेत. त्यामुळे आपले नगरसेवक फुटण्याच्या धसक्यानेच शिवसेनेवर बेछूट आरोप करत असल्याचा आरोप यशवंत जाधव यांनी केला आहे. उलट भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल, असे भाकित जाधव यांनी केले आहे.
भाजपने ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपाची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हे केलेला आरोप सिद्ध करून दाखवाचेच, असे आव्हान भाजपला दिले आहे. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरही झाले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना भाजपचे नगरसेवक, नेते मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवालही यशवंत जाधव यांनी केला आहे.
सफाई कामगारांना कामाच्या ठिकाणापासून जवळ घर मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. अखेर हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यामध्ये मुंबई शहरात १,१२१, पश्चिम उपनगरात १,४९९ आणि पूर्व उपनगरात १,३८६ अशी एकूण ४,००६ घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेच सफाई कामगारांना न्याय दिला असल्याचेही यशवंत जाधव म्हणाले.
भाजपचे नगरसेवक त्रस्त आहेत. आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना वरीष्ठ नेते धमकावत आहेत. त्यातूनच केवळ राजकारण करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात असून एक सांगतो की, डिसेंबरपर्यंत थांबा भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश केल्याचे पाहायला मिळतील,असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
Speech against BJP at Dussehra rally, then Shiv Sena’s attack on BJP corporators in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!