• Download App
    मुंबई महापालिकेतील विविध विभागांमधील अनियमितेबाबत विशेष चौकशी समिती! Special inquiry committee regarding irregularities in various departments of Mumbai Municipal Corporation

    मुंबई महापालिकेतील विविध विभागांमधील अनियमितेबाबत विशेष चौकशी समिती!

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास दिली मंजुरी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.  या समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सहपोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. Special inquiry committee regarding irregularities in various departments of Mumbai Municipal Corporation

    मुंबई महापालिकेत नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरीक्षण अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे.

    यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.

    Special inquiry committee regarding irregularities in various departments of Mumbai Municipal Corporation

    Related posts

    Abhijit Deepke : दीपके म्हणाले- विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई तत्काळ थांबवा; नाहीतर मोठे आंदोलन होईल, CJP चा दोन दिवसांत दुसऱ्यांदा आंदोलनाचा इशारा

    Dattatray Bharne : कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

    Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण; कोर्ट SITच्या तपासाची नियमावली ठरणार; प्रकाश आंबेडकर यांची माहिती, सरकारच्या ठरावावर घेतला आक्षेप