• Download App
    मुंबई महापालिकेतील विविध विभागांमधील अनियमितेबाबत विशेष चौकशी समिती! Special inquiry committee regarding irregularities in various departments of Mumbai Municipal Corporation

    मुंबई महापालिकेतील विविध विभागांमधील अनियमितेबाबत विशेष चौकशी समिती!

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास दिली मंजुरी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.  या समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सहपोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. Special inquiry committee regarding irregularities in various departments of Mumbai Municipal Corporation

    मुंबई महापालिकेत नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरीक्षण अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे.

    यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.

    Special inquiry committee regarding irregularities in various departments of Mumbai Municipal Corporation

    Related posts

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत- कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही; पण मराठा नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!