• Download App
    Chief Minister कर्तव्यावेळी कधी शिव्या तर कधी फुलांचे हार,

    Chief Minister : कर्तव्यावेळी कधी शिव्या तर कधी फुलांचे हार, मुख्यमंत्री म्हणाले समाजासाठी काम करणे माझे कर्तव्य

    Chief Minister

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Chief Minister प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात. त्यामुळे टीका झाली तरीही मी जराही विचलित झालो नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.Chief Minister

    मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. सरकारचा जीआर स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. तसेच मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण आता संपलेले आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनच तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणत्र द्यावे, या मागणीला कायदेशीर अडचणी होत्या. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नव्हते. त्यामुळे हीच वस्तूस्थिती मनोज जरांगे यांच्या टीमच्या लक्षात आणून देण्यात आली.Chief Minister



    देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नव्हे तर व्यक्तीला मिळत असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीने ते आरक्षण मागायचं असतं. परंतु सरसकट आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही, हे मनोज जरांगे यांच्या टीमला सांगण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे यांनीदेखील ही भूमिका समजून घेतली. कायद्यात सरसकट आरक्षण बसत नसेल तर ते करू नका, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा केली आणि जीआर तयार झाला.

    मनोज जरांगेंकडून वारंवर टीका करण्यात आली, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्यावर टीका झाली तरीही मी जराही विचलित झालो नाही. कारण समाजाला न्याय देणे हेच माझं ध्येय होतं. न्याय देताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही आणि अन्यायाची भावना निर्माण होणार नाही, असा कायदेशीर निर्णय करावा लागेल. यासाठी मराठा असो, ओबीसी असो वा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात.

    Sometimes insults and sometimes garlands of flowers during duty, Chief Minister said it is my duty to work for the society

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Controversial statement by Sunil Kedar : “ गुलामगिरी करणाऱ्या आधिकाऱ्यांना मुजरा करायला लावतो.‌” सुनील केदार यांचे वादग्रस्त वक्तव्य

    Amendments in Factory Act : मंत्रिमंडळ निर्णय: कामगारांसाठी कारखाना कायद्यात सुधारणा, कामाचे तास वाढले.

    Pune Metro : पुणे मेट्रोला नवीन बळ: दोन नवीन स्थानके आणि 683 कोटींचा निधी मंजूर