प्रतिनिधी
मुंबई : भारतीय युद्धनौका विक्रांत बचाव प्रकरणात किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये कमावले याचा कोणताच आधार तक्रारदाराने तक्रारीत दिलेला नाही. त्यामुळे ही तक्रार केवळ प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर आधारित आहे, असे सांगत मुंबई हायकोर्ट आहे किरीट सोमय्या यांना दिलासा दिला आहे. मात्र, पुढचे चार दिवस 11.00 ते 5.00 या वेळेत पोलिस चौकशीला सामोरे जाण्याचे निर्देश दिले आहे. या चौकशी दरम्यान किरीट सोमय्या यांना अटक झाली तर पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेशही हायकोर्टाने देऊन ठेवले आहेत. Somaiya – INS Vikrant 57 crore mumbai highcourt
किरीट सोमय्या यांनी विक्रांत बचावच्या नावाखाली 57 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांनी केला होता.
यासंदर्भात एका माजी नौदल अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस अधिकारी किरीट सोमय्या यांच्या घरी गेले होते. त्यांना हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी समस्यांच्या घरावर चिकटवली होती.
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या मुंबई हायकोर्टात गेले होते. मुंबई हायकोर्टाने किरीट सोमय्यांविरुद्धच्या या तक्रारीत स्पष्टता नाही. 57 कोटी रुपये जमवल्याचा कोणताही आधार तक्रारदाराने दिलेला नाही, असे निरीक्षण नोंदवत किरीट सोमय्या यांना पोलिस चौकशीला चार दिवस हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र या चौकशी दरम्यान त्यांना अटक केली तर लगेच 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
हायकोर्टाच्या या आदेशाच्या बद्दल किरीट सोमय्या यांनी ट्विट करून आभार मानले आहेत. आपण 57 कोटी रुपये जमवल्याचा आरोप ठाकरे सरकार कोर्टात स्पष्ट करू शकले नाही. एकही कागद त्यांनी तिथे सादर केला नाही, असे किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.