• Download App
    सौर ऊर्जा फिडरचा शेतकऱ्यांना मोठा लाभ, दिवसाही देणार वीज; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेची घोषणा|Solar energy feeder scheme to be implemented in maharashtra

    सौर ऊर्जा फिडरचा शेतकऱ्यांना मोठा लाभ, दिवसाही देणार वीज; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सौर ऊर्जा फीडर योजना राबवून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल. त्यांना दिवसा वीज देण्यात काही अडचण येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील दिली.Solar energy feeder scheme to be implemented in maharashtra

    विधानसभेत नियम 293 अन्वये विविध विषयांवरील विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी मांडलेले ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :



    • राज्यात आम्ही सरकारमध्ये असताना 2017 मध्ये सौर ऊर्जा फीडर योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि दिवसा वीज मिळेल.
      आजच्या स्थितीत एकूण 548 मेगावॅटचे प्रकल्प कार्यरत असून 1083 इतकी स्थापित क्षमता निर्माण झाली आहे.
    • एकूण 1650 क्षमतेच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून 1000 ची येत्या काळात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यासाठी आर्थिक बाबतीत कोणतीही अडचण नाही. शेतकऱ्यांना वार्षिक 75,000 भाडे (2 % वाढीसह) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    • 30 % चे लक्ष्य ठेवण्यात आले असले तरी 2025 पर्यंत 50 % टक्के काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. अजित पवार यांनी वीजबिल माफीचा मुद्दा उपस्थित केला, पण मी विरोधी पक्षनेता म्हणून मागणी केली, ती कोविड काळासाठी. मध्य प्रदेशने तसाच निर्णय घेतला होता.
    • पैनगंगा-वैनगंगा माध्यमातून 62 टीएमसी पाणी मिळणार आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे. आता त्यात वाशीम जिल्ह्याचा समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

    • वाहून जाणारे पाणी गोदावरी, तापी खोऱ्यात आणण्यासाठी दमणगंगा पिंजाळ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातून मुंबईला पाणीपुरवठा होईलच पण मराठवाड्याला मोठा लाभ होणार आहे. नारपार गोदावरी, गिरणा, तापी पुनर्भरण, मराठवाडा स्थिरीकरण असे अनेक प्रकल्प आहेत.
    • जिगाव प्रकल्पाला यावर्षी निधी देण्यात आला आहे. भूसंपादनाची कामे करण्यासाठी सुद्धा निधी देण्यात आला आहे. एकूणच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सुमारे 7 ते 8 वर्षात हे प्रकल्प पूर्ण होतील. यामुळे पाण्याचे संघर्ष संपतील. शासन यासाठी निधी उभारणी करेल.
    • धाराशिव जिल्ह्यातील दावे फेटाळले, तेव्हा आपण न्यायालयीन लढाई केली आणि त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
    • बियाणे मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येत आहेत. त्यांचे भाव वाढू नये, यासाठी नेहमीच सरकार लक्ष देत असते.

    Solar energy feeder scheme to be implemented in maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!