वृत्तसंस्था
मुंबई : राज्यांतील मंत्र्यांनी खंडणीसाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे, आयटी छाप्यात हे उघड झाले आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेवर हल्लाबोल केला. Software for ransom of ministers in states; Devendra Fadnavis attacks Shiv Sena
फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा बंगाल करायचा म्हणजे काय करायचे आहे? तेथे खंडणी आणि आंदोलनांमुळे एकही उद्योग टिकला नाही. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात काय करायचे आहे? तुम्ही नेतृत्व करता त्या सरकारचे मंत्री भ्रष्ट आहेत. काही मंत्र्यांनी तर खंडणीसाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. तसे छाप्यात उघड झाले.
फडणवीस म्हणाले, राज्यात प्रचंड दलाली सुरू आहे. काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. किती वसुली करायची हे ठरले आहे, हे छाप्यातून दिसते. ईडी, सीबीआयचे भय कुणाला आहे? ज्यांनी काही केले नाही त्यांना भय कशाला? आम्हाला राज्य भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एजन्सीचा गैरवापर करण्याविरोधात आहेत. जर राजकारणासाठी आम्ही हे केले असते तर तुमचे अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात गेले असते. मागच्या सरकारने जसा दुरुपयोग केला तसा आम्ही करणार नाही. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय पंतप्रधान मोदी गप्प बसणार नाहीत.
Software for ransom of ministers in states; Devendra Fadnavis attacks Shiv Sena
महत्त्वाच्या बातम्या
- सिंघू बॉर्डरवरील हत्येप्रकरणी शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले – आमचे आंदोलन धार्मिक नाही, निहंगांनी येथून निघून जावे!
- Congress CWC meeting : कोण होणार अध्यक्ष?अखेर हायकमांडने बोलावली बैठक ; कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक आज ह्या मुद्द्यांवर चर्चा
- भारतीय वंशाचे रवी चौधरी पेंटागॉन मधील महत्त्वाच्या पदावर
- दलित शेतमजूराच्या हत्येनंतर ‘फुरोगाम्यां’मध्ये ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’
- Good News : टीम इंडियाची सूत्र ‘द वॉल’ कडेच ; राहुल द्रविडचा होकार ; अखेर होणार हेड कोच …