विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला. त्यानंतर तो मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनी यावर्षीपासून कायम ठेवला. पुढच्या सरकारांनी सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी केली. 2025 मध्ये अचानक जितेंद्र आव्हाड + संजय राऊत आणि बाकीच्या विरोधकांनी हा वाद उकरून काढला.
स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवावेत. मांस विक्री बंद ठेवावी, असे आदेश वेगवेगळ्या महापालिकांनी काढले. मात्र, त्यावरून ब्राह्मणवादाचा वाद उकरून काढत जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्यावर टीका केली. त्यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे संजय राऊत हे देखील सरकारवर शरसंधान साधायला पुढे आले. नेहमीप्रमाणे त्यात संविधान, काय खावे काय खाऊ नये, यासंबंधी लोकांचे अधिकार वगैरे बाबी मिसळल्या. त्यामध्ये अजित पवारांनी विरोधकांच्या बाजूने मत व्यक्त करून वादाला फोडणी दिली, पण फडणवीस सरकारने कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला.
या पार्श्वभूमीवर मूळ निर्णयाचा शोध घेतला असता तो निर्णय 12 मे 1988 रोजी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना घेतला गेला होता. त्यानंतर महिनाभरातच मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवले होते. त्यानंतरच्या सरकारांनी त्या निर्णयाचे पालन केले होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील 15 ऑगस्ट 2021 ला कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती. त्या मंत्रिमंडळात अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही होते. त्यावेळी त्यांनी कत्तलखाने बंद ठेवायला विरोध केला नव्हता.
पण आता 2025 च्या स्वातंत्र्यदिनाआधी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय फक्त फडणवीस सरकारनेच घेतला आहे असे भासवून जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला.
Slaughterhouses closing decision was earlier taken by congress governments
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगावर नुसते Hit and Run करून राहुल गांधींना मोदींची सत्ता घालवता येईल का??
- महादेवपुराचे उदाहरण देणाऱ्या राहुल गांधींना बारामतीचे उदाहरण देऊन अजितदादांचे प्रत्युत्तर!!
- Israeli Attack : इस्रायली हल्ल्यात अल जझीराचे 5 पत्रकार ठार; इस्रायलने त्यांना हमास दहशतवादी म्हटले
- Parinay Phuke : बेताल विधाने करून मनाेज जरांगेंचा मीडियामध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न, परिणय फुके यांची टीका