विशेष प्रतिनिधी
मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेसाठी अर्ज करण्यास व मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास यावर्षीच्या प्रक्रियेत सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली. आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. Sixth extension to apply for post-matric scholarship, freeship
महाडीबीटी पोर्टलद्वारे या दोनही योजनांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता केंद्रशासनाने अंतिम मुदत दिली होती, मात्र राज्य शासनाने काही शिक्षण कोर्सेसचे अंतिम प्रवेश अजूनही सुरू असल्याने विशेष प्रयत्नातून 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यावर्षीच्या अर्ज प्रक्रियेत आतापर्यंत 5 वेळा मुदत वाढ देण्यात आली असून ही सहावी वेळ आहे. या योजनांशी संबंधित विद्यार्थी व पालकांनी 28 फेब्रुवारीच्या आत महाडीबीटी पोर्टलद्वारे आपले अर्ज नोंदवून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
Sixth extension to apply for post-matric scholarship, freeship
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेन-रशिया संकट : अमेरिकेने युक्रेनच्या विभक्त झालेल्या भागांत व्यापार आणि गुंतवणुकीवर निर्बंध लादले, म्हणाले- आता बाजूला उभे राहण्याची वेळ नाही!
- युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र राष्ट्राची मान्यता; रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांची मोठी घोषणा
- रशिया, युक्रेन वादात भारताची विश्वामित्र भूमिका; युद्ध संघर्ष टाळण्याचे दोन्ही देशांना आवाहन
- कोविड मृत्यु भरपाईसाठी मुंबईत ३५ हजार अर्ज; कुटुंबियांना ५० हजार रुपये सहाय्य
- बिहारमध्ये अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात नोटांची बंडलेच बंडले; ८९ लाखांची बेहिशोबी रक्कम आढळली