• Download App
    गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली, व्हेंटिलेटरवर शिफ्ट केले; 28 दिवसांपासून रुग्णालयात । Singer Lata Mangeshkar health deteriorated again, shifted to ventilator; In hospital for 28 days

    गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली, व्हेंटिलेटरवर शिफ्ट केले; 28 दिवसांपासून रुग्णालयात

    भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ९२ वर्षीय लतादीदी आयसीयूमध्ये आहेत. Singer Lata Mangeshkar health deteriorated again, shifted to ventilator; In hospital for 28 days


    वृत्तसंस्था

    मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ९२ वर्षीय लतादीदी आयसीयूमध्ये आहेत.

    डॉक्टरांच्या पथकाकडून विशेष देखरेख

    लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्‍या प्रतीत समधानी यांनी माध्यमांना सांगितले की, लताजींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक 24×7 त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

    उपचारादरम्यान मृत्यूची अफवा

    काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा पसरली होती. यानंतर त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत कुटुंबीय म्हणाले की, कृपया खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका आणि या बातम्या बंद करा. ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या प्रतीत समधानी यांनी एक अपडेट दिले आहे. दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परताव्यात, अशी जगभरातील तमामत चाहत्यांकडून प्रार्थना होत आहे.



    पाच दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, “मी लताजींवर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी बोललो. त्या बरे होत आहेत. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. त्या आधी व्हेंटिलेटरवर होत्या.” पण आज त्यांचे व्हेंटिलेटरही काढले आहे. आता त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. लताजींनी डोळे उघडले आहेत आणि डॉक्टरांशीही बोलत आहेत. कोरोनामुळे त्या थोड्या अशक्त झाल्या आहेत, पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे,” अशी माहिती त्यांनी दिली होती.

    Singer Lata Mangeshkar health deteriorated again, shifted to ventilator; In hospital for 28 days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!