विशेष प्रतिनिधी
वसमत : लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडे मुद्दे नाहीत. राज्यात सरकार गेल्याने विरोधक सैरभैर झाले असून बाप नंबरी अन बेटा दस नंबरी असा प्रकार सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पितापुत्रांचे नांव न घेता वसमत येथे बुधवारी, (दि. 24 )केली आहे.Since the government is gone, the father is numberless and the son is numberless; Chief Minister Eknath Shinde criticized the Thackeray family
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्देच नाहीत. राज्यातील सरकार गेल्याने विरोधक सैरभैर झाले असून ते भ्रमिष्ट झाले आहेत. बाप नंबरी अन बेटा दस नंबरी असे प्रकार सुरु असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांनी भाषणात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुख्यमंत्र्यांना नीच म्हटले, मात्र हा प्रकार मतदार खपवून घेणार नाही. माझ्यावर कितीही आरोप केले तरी त्यांचे कामातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधक दरवेळी सरकार पडणार असे म्हणत होते. मात्र त्यांचा चांगला ज्योतिषीच मिळाला नाही. सरकार पडले नाही उलट मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले. वसमत येथे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. यावेळी आमदार राजेश नवघरे, आमदार संतोष बांगर, पाशा पटेल, माजी खासदार ॲड. शिवाजी माने, राजू चापके पाटील, बी. डी. बांगर, ॲड. शिवाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत 15 हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच 122 सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्याचेही पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या असून राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ पुर्ण केली असून कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण टिकवून दाखविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात महायुतीच्या सरकार मध्ये सर्व समाज गुण्यागोविंदाने राहात आहे. सर्व सण, उत्सव शांततेत पार पाडले जात आहेत. मात्र काँग्रेसने मुस्लीम व दलित समाजाचा केवळ मतपेटीसाठी वापर करून घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
देशात मागील 60 वर्षात केंद्रातील सरकारने गरीबी हटावचा नारा दिला मात्र गरीबी हटलीच नाही तर गरीबच हटले. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात 25 कोटी जनता दारिद्रय रेषेतून वर आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Since the government is gone, the father is numberless and the son is numberless; Chief Minister Eknath Shinde criticized the Thackeray family
महत्वाच्या बातम्या
- कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था पवारांनी बळकावली; उदयनराजेंचा साताऱ्यातून थेट हल्लाबोल!!
- पवारांची मानभावी माफी त्यांच्यावरच उलटली; अमरावतीत शाह – फडणवीसांनी सादर केली पवारांच्या चुकांची यादी!!
- मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ
- तुम्ही काँग्रेसला मतदान करा किंवा करू नका, निदान माझ्या अंतयात्रेला तरी या; कलबुर्गीच्या मतदारांवर मल्लिकार्जुन खर्गेंचा वैताग!!