• Download App
    शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याला अटक Shripad Chhindam arrested,used insulting words against Shivaji Maharaj

    शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याला अटक

    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा शिवसेनेचा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. Shripad Chhindam arrested,used insulting words against Shivaji Maharaj


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा शिवसेनेचा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

    एक ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी ही माहिती दिली. या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. तर याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना मात्र, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

    श्रीपाद छिंदम हा नगरचा माजी महापौर आहे. एका ठेकेदाराला धमकावताना त्याने शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द वापरले होते.त्याची क्लिप व्हायरल झाल्यावर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर छिंदम फरार झाला होता.नंतर पोलिसांनी अटक केली होती.

    नगर महापालिकेच्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत छिंदम अपक्ष म्हणून निवडूनही आला होता.2019 ची महापालिका निवडणूक त्याने बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लढवली होती.पण या निवडणुकीत मतदारांनी त्याला धडा शिकवला होता.

    Shripad Chhindam arrested,used insulting words against Shivaji Maharaj

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यासाठी सगळी तडफड!!

    TCS corporate Jihad : जिहाद्यांकडून बुलडोझर कारवाईचे फुले उधळून स्वागत; इथून पुढे बुलडोझरच्या पलीकडची कारवाई आवश्यक!!

    TCS corporate Jihad : निदा खानचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; पण पटेलला आलिशान घर बांधून द्यायची इम्तियाज जलीलची भाषा!!