• Download App
    मोगरा महोत्सवात 'दगडूशेठ' ला ५० लाख फुलांचा सुवासिक पुष्पनैवेद्य Shrimant Dagdusheth Ganpati temple beautiful decorated by ५० lakhs floors

    मोगरा महोत्सवात ‘दगडूशेठ’ ला ५० लाख फुलांचा सुवासिक पुष्पनैवेद्य

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त ५० लाख सुवासिक फुलांचा पुष्पनैवेद्य गणरायाला दाखविण्यात आला आहे. Shrimant Dagdusheth Ganpati temple beautiful decorated by ५० lakhs floors


    विशेष प्रतिनिधी

    पुणे -मोग-यासह गुलाब, चाफा, झेंडू, लिलीसारख्या फुलांनी सजलेला सभामंडप आणि गाभारा तसेच मुकुट, शुंडाभूषण, कान व पुष्पपोशाखाने सजलेले गणरायाचे मनोहारी रुप पुणेकरांना पहायला मिळाले. Shrimant Dagdusheth Ganpati temple beautiful decorated by ५० lakhs floors

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त ५० लाख सुवासिक फुलांचा पुष्पनैवेद्य गणरायाला दाखविण्यात आला होता. अंगारकी चतुर्थीनिमित्त कळसापासून पायथ्यापर्यंत केलेली पुष्पआरास आणि मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्याकरीता भाविकांनी मोठी गर्दी केली.

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले होते.

    पुष्पसजावटीची तयारी तब्बल १०० महिला व १२५ पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ७०० किलो मोगरा, २५ हजार चाफा, ५० हजार गुलाब, ५० किलो कन्हेर, जाई, जुई, केवळा, कमळ, ५०० किलो गुलछडी, पासली, लिली यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

    Shrimant Dagdusheth Ganpati temple beautiful decorated by ५० lakhs floors

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर