वृत्तसंस्था
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चेल्या चपाट्यानी सहकार क्षेत्राचे पार वाटोळे केले आहे. मान्यवरांनी मोठ्या हिमकतीने सहकाराचे बारसं घातलं. परंतु, शरद पवार यांच्या चेल्यांनी सहकाराचचं श्राद्ध घातले आहे, अशी खरमरीत टीका स्वाभिमानाचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली. Shraddha of cooperation from Sharad Pawar’s Asaociate ; Sadabhau Khot’s criticism, 55 Sugar factories took over by Pawar’s Asaociate
खासदार संजय विखे-पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल महागले तर काय झाले, मोफत सुविधा आणि लस मिळत आहे
सदाभाऊ खोत नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सहकार चळवळ, साखर कारखाने, कारखान्याचे होत असलेले खासगीकरण आदींवर भाष्य केले.
कै. यशवंतराव चव्हाण साहेब, बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ, सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी राज्यात सहकाराच बारस घातलं आणि शरद पवार साहेबांच्या चेल्यांनी या सहकाराचचं श्राद्ध घातल आहे, असे खोत म्हणाले.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गैरव्यवहार प्रकरणी ते म्हणाले, केवळ जरंडेश्वर कारखानाच नव्हे तर त्यासारखे राज्यातील ५५ साखर कारखाने लिलावात काढण्यात आले आहेत. ते शरद पवार यांच्या चेल्यानीच खरेदी केले आहेत. या माध्यमातून सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण करून स्वतःची घरे भरण्याचे उद्योग चेल्यांचे सुरु केले आहेत.
Shraddha of cooperation from Sharad Pawar’s Asaociate ; Sadabhau Khot’s criticism, 55 Sugar factories took over by Pawar’s Asaociate
महत्त्वाच्या बातम्या
- शेजाऱ्याच्या अॅट्रॉसिटीच्या धमक्यांना वैैतागून ब्राम्हण कुटुंबाचा मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा इशारा, पंतप्रधानांनाच पाठविले पत्र
- बांग्ला देशी दहशतवाद्यांचा देशात घातपाताचा कट, पश्चिम बंगालमधून १० दहशतवादी देशाच्या विविध भागात
- भारताच्या वारंवार कांदा निर्यातबंदीवर जपान, अमेरिकेचा आक्षेप
- माध्यमांनी केले “स्टार”; राजकारणात पडले “गार”…!!