• Download App
    पुण्यातील दुकाने उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार, व्यापारी असोसिएशनचा बंदला पाठिंबा|Shops in Pune will remain closed till 3 pm tomorrow, with the support of the traders' association

    पुण्यातील दुकाने उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार, व्यापारी असोसिएशनचा बंदला पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी बंद पुकारला आहे. पुण्यातील दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी पुणे व्यापारी फेडरेशनची बैठक घेण्यात आली.Shops in Pune will remain closed till 3 pm tomorrow, with the support of the traders’ association

    त्यात सर्वानुमते उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोधनी आणि गणपतराज जैन यांनी सांगितले की सर्व सभासदांनी नोंद घेऊन उद्या 3 नंतर दुकाने उघडावित.



    पुण्यात सोमवारी रिक्षा,टेम्पो, धान्य बाजार ,भाजीपाला बाजार बंद राहणार आहे. शहरातील धान्य बाजार, भाजीपाला व फळे बाजार ,प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षा, मालवाहतूक करणारे टेम्पो, तसेच विविध जीवनावश्‍यक वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे हातगाडी चालक ,टपरी व पथारी व्यवसाय बंद राहणार आहेत.

    Shops in Pune will remain closed till 3 pm tomorrow, with the support of the traders’ association

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, पण ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!

    Bihar Maha : महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 20 महिन्यांत प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा

    Jain Muni : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच, त्यांनी पापांचे प्रायश्चित्त घ्यावे; जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची भूमिका