नाशिक : ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेनेची “दमदार” कामगिरी!!, अशा शब्दांमध्येच शिवसेनेच्या नाशिक मधल्या आजच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.Shivsena UBT conclave in Nashik
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने नाशिक मधल्या शिवसेनेच्या दिवसभराच्या मेळाव्याची सांगता झाली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातच शिवसैनिकांनी भाजपची कॉपी हाणावी आणि इथून पुढच्या निवडणुका जिंकाव्यात, असा तरुण + तडफदार संदेश शिवसैनिकांना दिला.
त्याआधी शिवसेनेच्या या मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी AI अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे केलेले जोरदार भाषण ऐकविण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे केलेल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी “कमळाबाई” म्हणून भाजपची जोरदार खिल्ली उडवली. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्याचवेळी बाळासाहेबांनी केंद्रातल्या मोदी सरकारला आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारला जोरदार ठोकून काढले. बाळासाहेबांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे केलेले हे भाषण मराठी माध्यमांमध्ये फारच गाजले.
उद्धव ठाकरे म्हणाले :
भाजपने फेक नॅरेटिव्ह चालवून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यांचे बूथ मॅनेजमेंट चांगले होते. माझ्याकडे त्याची एक कॉपी आली. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की प्रत्येक बूथवर एक अध्यक्ष पाहिजे. त्याच्या कमिटी मध्ये किमान तीन महिला, अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधी हे पाहिजेतच. या सगळ्यांनी आपापल्या बूथ वरच्या प्रत्येक मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजे. त्यानुसार भाजपच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत काम केले.
शिवसैनिकांनी देखील यापुढच्या निवडणुकीत बूथ मॅनेजमेंट केले पाहिजे. आपल्याकडे पूर्वी ही सिस्टीम होती, पण आपण ती विसरलो. कोरोना काळात आपल्या सरकारने केलेल्या चांगल्या कामाची माहिती सुद्धा मतदारांपर्यंत आपण पोहोचवली नाही. इथून पुढे असे होता कामा नये. चांगले बूथ मॅनेजमेंट करून आपण इथून पुढच्या निवडणुका जिंकल्या पाहिजेत.
उद्धव ठाकरेंच्या या पुढच्या भाषणाचा भर केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारवर कोरडे ओढण्याचा होता, पण त्यांनी शिवसैनिकांना भाजपच्या बूथ मॅनेजमेंटचे दिलेले धडे एक महत्त्वाचे ठरले. त्यामुळे शिवसेनेचा नाशिक मधला मेळावा, ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; पोट शिवसैनिकांवर दमदार कामगिरी!!, अशा स्वरूपाने गाजला.
Shivsena UBT conclave in Nashik
महत्वाच्या बातम्या
- Sukanta Majumdar तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Aamby Valley City : ‘ED’ची मोठी कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटीजवळील ७०७ एकर जमीन जप्त
- तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का!