• Download App
    एकनाथ शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराचे प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ विधानसभा उपाध्यक्षांना होणार सादर!!Shivsena splits : eknath shinde group to submit Affidavit and video to maharashtra assembly deputy speaker

    एकनाथ शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराचे प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ विधानसभा उपाध्यक्षांना होणार सादर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ जणांच्या गटाचे पत्र विधानसभेच्या उपाध्यक्ष यांना पाठवण्यात आले असले तरी त्याला पुष्टी देण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी चालू आहेत. यासाठी त्यांनी आपल्याकडे असलेल्या आमदारांचे समर्थन दिल्याचे व्हिडिओ आणि त्यांच्याकडून वैयक्तिक प्रतिज्ञापत्र तयार करून घेतले आहे. Shivsena splits : eknath shinde group to submit Affidavit and video to maharashtra assembly deputy speaker

    एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात 40 हून अधिक शिवसेनेचे आमदार आणि 12 अपक्ष आमदार असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने आमच्याकडे सध्या १८ आमदार उरल्याचे म्हटले आहे. शिवाय शिंदे गटाकडे असलेले काही आमदार हे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शिवसेनेला पाठिंबा देतील, असा दावाही केला आहे. मात्र, शिंदे गटाने सर्व आमदारांची विशेष काळजी घेतली असून सर्व आमदार स्वेच्छेने तिथे गेल्याचे वारंवार प्रसारित केलेल्या व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. या आमदारांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेतील नवीन गट स्थापन केला आहे. या नवीन गटात सामील झालेल्या सर्व आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांना पाठवले आहे.


    एकनाथ शिंदे : महाविकास आघाडी सरकारचा रडीचा डाव, माझ्याकडे शिवसेनेचे 40+ आणि अपक्ष 12 = 50+ आमदार!!


     

    – त्यानंतरच निर्णय घेतला जाणार

    विधानसभा उपाध्यक्ष यांनी या सर्व स्वाक्षरीचे पत्र पडताळणी करून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे कळवले आहे. अल्प मतात आलेल्या सरकार बरखास्त झाल्यास किंवा त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यास विद्यमान सरकारच्या विरोधात होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत आमदारांकडून वैयक्तिक प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलेले आहे. तसेच या प्रतिज्ञापत्र सोबत त्यांचे व्हिडीओही बनवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हे प्रतिज्ञापत्र आमदारांनी लिहून असून आपण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटात सामील झाल्याचे म्हटले आहे.

    आमदारांचे हे व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र विधानसभेच्या उपाध्यक्ष यांना पाठवले जाणार आहेत. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष यांनी या सर्व बाबींची चाचणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतील. त्यामुळे नवीन सरकार स्थापनेच्या वेळी विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा वेळेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या वेळी शिंदे यांच्या सह त्यांचे आमदार उपस्थित राहतील. ही फ्लोअर टेस्ट विधिमंडळ किंवा राज्यपाल यांच्या उपस्थितीत होऊ शकते. जर महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोविड बाधित असतील तर याचा अतिरिक्त कार्यभार गोवा राज्यपाल यांच्याकडे असल्याने तिथेही हे आमदार आपल्या गटाची ओळख देऊ शकतात.

    Shivsena splits : eknath shinde group to submit Affidavit and video to maharashtra assembly deputy speaker

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!