विशेष प्रतिनिधी
मुंबई : घोषणा मोठ्या स्वबळाच्या, पण उड्या मात्र शंभरीच्याच कुंपणातल्या!!, अशी अवस्था महाराष्ट्रातल्या दोन प्रादेशिक पक्षांची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी या दोन प्रादेशिक पक्षांची नावे आहेत. Shivsena – NCP : contrast between political ambitions and their capabilities are high
शिवसेनेच्या काल बुलढाण्यात झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात शिवसेनेचे तुरुंगातून सुटून आलेले प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण केले. शिंदे गटावर जोरदार तोफा डागल्या आणि ठाकरे गटाची राजकीय महत्त्वाकांक्षाही जाहीर केली. महाराष्ट्रात 25 खासदार आणि 115 आमदार निवडून आणून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची हिंमत शिवसेनेकडे आहे, असे त्यांनी जाहीर केले.
याचा अर्थ महाराष्ट्रातल्या 48 पैकी 25 खासदार म्हणजे निम्मे खासदार निवडून आणण्याची महत्त्वकांक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठेवली आहे, हे खरे. पण आमदारांची आमदार निवडून आणण्याची महत्वाकांक्षा मात्र 115 वरच अडली आहे. याचा दुसरा अर्थ असा की स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या घोषणा करणाऱ्या शिवसेनेची आमदार निवडून आणण्याची महत्त्वाकांक्षा बहुमताच्या फार अलिकडची म्हणजे 145 आमदारांपेक्षा कमी तब्बल 30 ने कमी आहे. आता ज्या पक्षाची मूलभूत राजकीय महत्त्वाकांक्षाच बहुमतापेक्षा 30 ने कमी असेल, तो पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची घोषणा करतो आहे. म्हणजे त्या पक्षाचा नेता महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची वल्गना करतो आहे, असेच म्हणावे लागेल.
राष्ट्रवादी 100 आमदार
पण हे फक्त शिवसेनेच्या बाबतीत घडले असे नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील महाराष्ट्रात प्रचंड राजकीय ताकद निर्माण करून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. पण त्या ठरावात देखील राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. म्हणजे शिवसेनेने निदान शंभरी तरी पार केली आहे, पण राष्ट्रवादी मात्र बरोबर 100 अडली आहे, असेच त्यांच्या ठरावातून दिसून येत आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीची मूलभूत महत्त्वाकांक्षाच बहुमतापेक्षा तब्बल 45 ने कमी आहे.
म्हणजे मूळात ज्या पक्षांची राजकीय महत्त्वाकांक्षाच विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवायचीच नाही, त्यांच्या वल्गना मात्र महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याच्या आहेत आणि आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्री करण्याच्या आहेत ही यातली राजकीय विसंगती स्पष्ट दिसते आहे.
Shivsena – NCP : contrast between political ambitions and their capabilities are high
महत्वाच्या बातम्या
- बुद्धिवादी राष्ट्रवादी नेता हीच सावरकरांची खरी ओळख; दिल्लीच्या ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये रणजित सावरकरांचे रॅपिड फायर
- ITBP Recruitment : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीची संधी, करा अर्ज
- Imam Remuneration : मशिदींच्या इमामांना करदात्यांच्या पैशातून वेतन हे संविधानाचे हनन; केंद्रीय माहिती आयुक्तांचा निर्णय
- राज्यपालांनी पोलीस हुतात्म्यांचा अपमान केला म्हणणे द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे; राजभवनातून स्पष्ट खुलासा
- EPFO ची वेतन मर्यादा वाढविण्याचा केंद्राचा विचार; 7.5 दशलक्ष कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा